महाभियोगाची प्रक्रिया कोणावर चालविली जाते.
Answers
Explanation:
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन
काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी नोटीस दिली आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च स्थानावर असलेल्या व्यक्तीच्या विरोधात महाभियोग दाखल करण्याची प्रक्रिया आहे तरी कशी ती जाणून घेऊयात...
याआधी सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी.डी.दिनाकरण यांच्याविरोधात 2009मध्ये राज्यसभेत महाभियोग प्रस्ताव सादर केला होता. मात्र ही प्रक्रिया पुढे जाण्याआधीच दिनाकरन यांनी राजीनामा दिला. याशिवाय आणखी एका उच्च न्यायालयाचे आणि सरन्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव संसदेत सादर झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पदावरून हटवायचे असेल तर त्या प्रस्तावाला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी दोन तृतियांश बहुमताने मंजूर करण्याची गरज असते. पण त्यात देखील जर तर अशा अटी आहेत...
- घटनेतील कलम 124 (4) नुसार सरन्यायाधीशांना संसदेत ठराव करूनच पदावरून हटवता येते. यासाठीची जी प्रक्रिया आहे त्याला 'महाभियोग' असे म्हणतात.
- हा प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सभागृहांनी दोन तृतियांश बहुमतने मंजूर करावा लागतो.
- त्यानंतर त्याला राष्ट्रपतींची देखील मंजूरी मिळावी लागते.
- महाभियोग प्रस्ताव आणताना त्यासाठी ठोस पुरावे देखील सादर करावे लागतात.
- त्यानंतर राष्ट्रपती स्वत:च्या स्वाक्षरीने सरन्यायाधीशांना हटवण्याचे आदेश देतात.
- अन्यथा सरन्यायाधीश 65 वर्षापर्यंत त्यापदावर राहू शकतात.
- न्यायधीश (चौकशी) कायदा, 1968नुसार सरन्यायाधीशांना किंवा अन्य कोणत्याही न्यायाधीशांना केवळ अकार्यक्षमता आणि एखाद्या अपराधासाठीच पदावरून हटवता येते. पण अकार्यक्षमता आणि अपराध यांची व्याख्या देखील अस्पष्ट आहे. अर्थात यात गुन्हे आणि न्यायालयीन अनैतिकतेचा समावेश आहे.
महाभियोग प्रक्रिया वर चावला जाते