India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

महिला दिन विषयावर मराठीतून निबंध
Essay on women's day in Marathi

Answers

Answered by Anonymous
27

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Answered by Mandar17
29

महिला दिवस संपूर्ण जगभर उत्साहाने साजरा केला जातो. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून हा दिवस साजरा केला जात होता परंतु आता 8 मार्च रोजी प्रत्येक वर्षी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवसाला साजरा करण्यामागचा उद्देश असा की स्त्रियांना सशक्त करणे आणि  त्यांच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांसोबत लैंगिक समानतेची जाणीव करून देणे .

या दिवसाच्या निर्मितीसाठी कोणतीही एकच सरकार किंवा कोणत्याही संघटना जबाबदार नाही, त्याऐवजी मानवी हक्कांची काळजी घेणार्‍या प्रत्येकाच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. महिला दिनाच्या दिवशी समाजातल्या स्त्रियांच्या सर्व योगदानाचे आणि योगदानाबद्दलची आठवण करून दिली जाते. आणि आदर, सन्मान  केला जातो . आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस जागतिक स्तरावर देखील  साजरा केला जात आहे.

अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय महिला दिवस एकता, अखंडता, उत्सव आणि संघर्षांचे प्रतिबिंब आहे जे एक शतकांहून अधिक चांगले उमटून दिसत आहे आणि कालांतराने सशक्त होत आहे. आम्ही अनेक प्रतिज्ञा करतो परंतु त्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती विसरून जातो. तसेच जन्माला येणार्‍या प्रत्येकाचे मानवाधिकार समान आहेत परंतु आपण मात्र स्त्रियांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिलीच नाही आहे तर ही जाणीव स्त्रियांना व्हावी आणि त्या अधिक सक्षम बनल्या पाहिजेत यासाठी महिला दिवस साजरा केला जात आहे.जर त्यांना त्यांचे अधिकार माहीत असते तर ह्या दिवसाचा उगम झालाच नसता.

Similar questions