(महामार्गावरील सूचनाफलक) तुमच्याशी
बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा :
१) वाहने हळू चालवा.
२) पुढे एक किलोमीटरचा घाट आहे.
3) गरज पडेल तेव्हा सतत कर्णभोंगा वाजवा.
४) गतिरोधकावर वाहनाची गती कमी करा.
५)वाहन चालवताना भ्रमणध्वनी बंद ठेवा.
६) लक्षात ठेवा - 'नाहीपेक्षा उशीर बरा.'
Answers
Explanation:
महामार्ग सूचनाफलक आत्मकथन
माणसांनो। बाळांनो। मला आता खरंच कळेनासं झालय. तुम्हाला कोणत्या शब्दांत समजावून सांगू? कोणत्या भाषेत सांगू? परवा रात्री पाऊस पडत होता, एकजण गाडी झिकझंक झिकझेंग करीत चालवीत आला. मी दुरूनच पाहिलं आणि ओळखलं. हा दारू प्यायला आहे. दरीत कोसळणार होता. पण डोंगर-उताराला धडक दिली; म्हणून वाचला.
काय काय म्हणून सांगू? इथे वेड्यासारख्या स्पर्धा करतात. पुढे चालत असलेल्या गाड्यांना मागे टाकण्यासाठी कुठेही, कसेही धावतात. कोणताही नियम पाळत नाहीत. माणूस हा बुद्धिमान प्राणी म्हणून अभिमान बाळगतात. पण कसला बुद्धिमान! हा तर सर्वात जास्त बेदरकार प्राणी!
तुमच्यापैकी काही शहाण्या माणसांनी आम्हाला तयार केले. तुमच्यासाठी आम्ही इथे रात्रंदिवस, उन्हापावसात, थंडीवाऱ्यात डोळ्यात तेल घालून उभे राहतो. आम्ही कधी स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा केली नाही. आम्ही तुम्हाला कळवळून सांगतो की, बाबांनो, वाहने हळू चालवा. आता पुढे एक किलोमीटर लांबीचा घाट आहे. काळजी घेतली नाही, तर पाचशे फूट खोल दरीत कोसळाल. | तुमच्यासहित तुमच्या गाडीचा चक्काचूर होईल. गतिरोधकावर वाहनाची गती कमी करा, असे सांगून सांगून थकलो मी. अलीकडे त्या मोबाईलमुळे अनेकांचा जीव गेला आहे.
आता मात्र मी थकलोय. फक्त सांगायचे काम करणार. आमच्या कळवळण्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होताना दिसत नाही. ठीक आहे. येतो मी!
mark mark me as brain list
Explanation:
नमस्कार iiiio has not seen