Geography, asked by nathuramkawade987654, 9 months ago

महाराष्ट्राचा पठारी भाग
कोणत्या प्रक्रियेतून घडला
आहे? येथे दिसणाराखडकाचा
मुख्य प्रकार कोणता?​

Answers

Answered by shrutikengale123
47

Explanation:

दख्खनचे पठार हे दक्षिण भारतातील एक मोठे पठार आहे. या पठाराचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात आहे . नर्मदेच्या दक्षिणेला हा त्रिकोणी प्रदेश आहे. मेघालय पठार आणि त्याच्याशी संबंधित ईशान्येकडील डोंगराचा समूह हा दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे. दख्खनच्या पठाराच्या मुख्य भागापासून तो गंगेच्या मुखाकडील मैदानामुळे आणि सुंदरबनच्या प्रदेशामुळे अलग झाला आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिणेला असलेल्या दख्खनच्या पठारात अनेक पठारे सामावलेली आहे.पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दख्खनच्या पठाराच्या सीमा आहेत.

महाराष्ट्राचे पठार मुख्यत: अग्निजन्य(बेसाल्ट) खडकापासून बनले आहे. बेसाल्ट खडकांचे थर जवळ जवळ क्षितिजसमांतर आहेत आणि त्यामुळे संपूर्ण भूस्वरुपाची रचना पा-य्रांसारखी झाली आहे.या बेसाल्ट खडकांच्या रचनेला 'डेक्कन ट्रयाप ' म्हटले जाते . कर्नाटक-तेलंगाना पठार मुख्यत: कानाश्म आणि पत्तीताश्म खडकांनी बनलेले आहे. कर्नाटकचे पठार 'मैदान' या नावाने ओळखले जाते .

this is helpful for you

Answered by shindeshim
0

maharatratil pathari bhag kontay prakriyetun ghadla aahe

Similar questions