महाराष्ट्राच्या राज्यफुलाचा सन्मान कोणत्या फुलाला प्राप्त झाला आहे
Answers
Answer:
कडक उन्हाळ्यात जांभळ्या रंगाच्या फुलांनी फुललेले हे वृक्ष अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. शहरातील अनेक भागांत रस्त्याच्या शेजारी ही झाडे लावली आहेत. हे झाड साधारण गोलसर, डेरेदार असते. फूल पूर्ण उमलल्यानंतर सहा ते सात सेंटिमीटर व्यासाचे होते. त्या फुलाला झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या असतात. कोकणात नदीनाल्यांच्या काठांवर जारुळाची भरपूर झाडे दिसतात. बंगाल, आसाम, दक्षिण भारत, अंदमान निकोबार आणि श्रीलंकेतील जंगले येथे जारुळाची झाडे आहेत. म्यानमार, मलाया, चीन या देशांत नदीकाठी आणि दलदलीच्या भागात मोठ्या प्रमाणावर हे वृक्ष आढळतात. जारुळाचे झाड सरासरी दहा ते वीस मीटर उंचीचे असते. भारतात त्याचा वापर अधिकतर शोभेसाठी केला. रायगड जिल्ह्यात माणगाव येथे जारुळाचा अंदाजे शंभर फूट उंचीचा वृक्ष आहे. लाकूड लालसर रंगाचे, मजबूत, टिकाऊ, चमकदार असते. टिकाऊपणा आणि उपयोग याबाबतीत जारूळ सागवानाच्या झाडाशी स्पर्धा करते. जारुळाचे लाकूड इमारती, होड्या, घरबांधणी, पूल, मोटारी, विहिरींचे बांधकाम, जहाजबांधणी, रेल्वे वॅगनसह विविध वस्तू बनवण्याच्या कामात वापरले जाते.
Hope it Help's you
Drop some Thanks &
Mark as Brainliest