महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
Answers
Answered by
9
उष्णकटिबंधीय फळ
आंबा काजू नारळ इत्यादी
Answered by
1
Answer:
फळांच्या उत्पादनासाठी
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू, नारळ, सुपारी, आंबा हि प्रमुख फळपिके घेतली जातात. तेथे सुपारीची व नारळाची झाडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत.
किनारी भागाकडे ही झाडे जास्त आढळून येतात. 'माड' असे नारळाच्या झाडाला म्हटले जाते. तर 'पोफळी' असे सुपारीच्या झाडाला म्हटले जाते.
आंब्याच्या उत्पादनासाठी वेंगुर्ले व देवगड हे तालुके तर सावंतवाडी काजूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
त्याचप्रमाणे फणस, कोकम, जांभूळ अशी वेगवेगळी झाडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. देवगड तालुक्यातील हापूस आंब्याला देश-विदेशात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
Similar questions