महाविद्यालयात २१ जून रोजी साजरा झालेला 'योगदिन' अहवाल लिहा
Answers
Answer:
राज्यांतील सर्व शाळांत २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे आवाहन, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केले आहे. या दिवशी रविवार असल्याने ही सुटी नंतर घ्यावी, असे त्यांनी सांगितले. हा योग दिन साजरा करण्याची सक्ती केलेली नाही. मात्र, यानिमित्ताने राज्यांत ‘योगपर्व’ सुरू व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानिमित्ताने, दिल्लीतील राजपथावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राज्यातही हे योग पर्व सुरू व्हावे, यासाठी शाळांनी तो मोठ्या प्रमाणात साजरा करावा, असे आवाहन तावडे यांनी केले आहे.
अर्थात, योगासनांचा उत्साह या एकाच दिवसापुरता मर्यादित न ठेवता कायम रहावा. योगाभ्यासच्या माध्यमातून शिक्षित, सुसंस्कृत आणि स्वस्थ विद्यार्थी घडवण्याचा मनोदय तावडे यांनी व्यक्त केला आहे.