mahapur mahapur nibandh marathi
Answers
महापूर एक नैसर्गिक आपत्ती आहे. जर पावसामुळे व ढग फुटी मुळे शहरांत पाणी भरलं असेल त्याला महापूर म्हणतात. आपत्ती म्हंटली तर नुकसान होतंच. महापुरात जीवाची व संपत्ती दोन्ही गोष्टींचे नुकसान होते.
२००५ मध्ये महाराष्ट्रात महापूर आला होता. खूप घरं उध्वस्त झाली होते. लोकांना शून्यातून सुरवात करावी लागली होती. सर्व काही वाहून गेले होते. खूप लोक मरण पावले होते.
महापुरा नंतर सरकार मदत तर करते पण जीवाची तुलना पैशाने करणे शक्य नसते.
महापूर म्हटलं की डोळ्यांसमोर चहूकडे पसरलेलं पाणीच पाणी दिसू लागतं. संपत्ती, शेती, जनावरं, माणसं यांचं या पुरामुळे अतोनात नुकसान होतं.
गेल्या महिन्यात कोल्हापूर, नाशिक, सांगली सारख्या अनेक शहरांना पावसाने हवालदिल करून सोडलं. असंख्य लोक पुराच्या पाण्यात अडकून पडले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय जवान आणि सामान्य नागरिकांनी चोखपणे बजावलं.
पण या पुरामुळे झालेलं नुकसान नक्कीच भरून निघण्या सारखं नाही.या नैसर्गिक आपत्तीशी लढण्याचं सामर्थ्य सगळ्याच लोकांना दाखवावं लागेल.
एकत्रित प्रयत्न आणि सहकार्य, सरकारची मदत आणि लोकांची जिद्दच त्यांना या आपत्तीतून वाचवू शकते.