maje baba eassy in marathi
Answers
Answered by
4
काय लिहू आणि किती लिहू, चार ओळींमध्ये बंदिस्त करण्यासारखं बाबांचं व्यक्तिमत्व नाही आणि म्हणूनच आज पर्यंत बाबांवर एकही कविता नाही...
माझे बाबा... जन्म झाल्या झाल्या ज्यांनी मला पहिल्यांदा हाता घेतलं ते माझे बाबा...
माझ्या आजारपणात आईच्या बरोबरीने रात्र जागून काढणारे आणि पुन्हा सकाळी गुड मॉर्निंग
म्हणत पुन्हा ड्युटीवर जायला तयार असणारा माझा बाबा....
आई प्रेमानी घास भरवत असताना मला अंगाखांद्यावर खेळवणारे माझे बाबा...
आई अभ्यास घेत असताना मी ऐकला नाही तर रागवणारे माझे कठोर बाबा .... आणि नंतर 'मी जरा जास्तच रागावलो का?' असं आईला हळूच विचारणारे माझे प्रेमळ बाबा....
जगाच्या जागी वस्तू नाही ठेवल्या गेल्या आणि वेळच्या वेळेवर काम नाही झाले तर चिडणारे शिस्तप्रिय बाबा.....
परीक्षेत पास झाल्यावर पेढे आणणारे, स्पर्धेमध्ये नंबर आल्यावर पेपरमध्ये नाव आणि फोटो आला असेल तर कात्रण कापून व्यवस्थित फाईलला लावणारे, बाहेरून येताना माझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणारे, माझं कौतुक करणारे माझे बाबा...
आपल्या मुलांसाठी आवर्जून वेळ काढणारे माझे बाबा...
गर्दित वाट काढत काढत माझे जास्तीत जास्त फोटो काढणारे माझे बाबा... माझा नाही आला तर समूजन सांगणारे बाबा.... नोकरीत व्यस्त असताना, आई कोणत्याही कर्तव्यात कधीही कमी पडणार नाही हे माहिती असून आजी आजोबांच्या गोळ्या औषधांची फोनवर चौकशी करणारे माझे कतव्यदक्ष बाबा...
दिवसा कमीत कमी 2 वेळा आमच्याशी फोनवर बोलणारे माझे बाबा.... बाहेरगावी असताना रात्री आमचे फोटो पाहत झोपणारे आम्हाला मिस करणारे माझे बाबा...
ऑफिस वरून आल्यावर मी दमलो अशी जराही तक्रार न करता आमच्याशी खेळणारे आणि आम्हाला बाहेर फिरायला घेऊन जाणारे माझे बाबा... आम्हाला आयुष्यात बेस्ट देण्यासाठी धडपडणारे माझे बाबा...
कुटुंबातल्या छोट्या मोठ्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभे राहून कुटुंबातल्या सगळ्यांना आधार देणारे माझे खंबीर बाबा.।।
बाबा नुसतं ऑफिस करतात असं म्हणताना या सगळ्या गोष्टींचा सहज विसर पडतो ना?
पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण, मुलाला मोठ्ठा करतो हाच तो बाप...
ज्या घरात बाप आहे त्याकडे कोणी वाईट नजरेने बघू शकत नाही.
हाच तो वडील ज्याला जवळ घ्यायला वेळा नाही... मुलाला चांगले मार्क्स मिळाले तर आई पापी देते... पण बाप हळूच पेढे आणून वाटतो हे कोणाला लक्षात येत नाही.
आमच्या मुलांना आमच्या लहानपणीचे किस्से सांगताना त्यामध्ये रमून जाणारे माझे बाबा...
आजही माहेरहून निघताना भरल्या आभाळासारख ज्यांच मन आणि डोळे भरून येतात ते माझे हळवे बाबा...
स्वत:साठी कधीही काहीही घेतलं नसताना, तुझ्या आई ने आजपर्यंत खूप केलं मला काही नको तिला साडी घे' असं आम्हाला सांगणारे आणि आईची जाणीव करणारे माझे बाबा...
माझी खूप आठवण येत असताना 'आईला तुझी खूप आठवण येते आईशी बोल' असं म्हणत आईच्या भावनांना समजून घेत आईला फोनवर जास्त बोलू देणारे माझे बाबा...
किती रूपं आहेत बाबांची... कठोर, प्रेमळ, कडक, शिस्तप्रिय कणखर खंबीर आणि किती तरी....
बाबा.. सतत घरच्यांच्या सुखासाठी झटणारे... घरच्यांची काळजी करणारे.... आई वडील बायको मुलं सगळ्यांच्या भावनांचा आदर करणारे अशे हे आपले सगळ्यांचे बाबा...
कशाची उपमा द्यायची बाबांना भरल्या आभाळची जे नेहमीच पावसासारख आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात....
आमच्या जीवनात आई आणि बाबा दोघांचेही महत्त्वाचे स्थान आहे... कुठेतरी वाचलं होतं आई घराचं मांगल्य आहे तर बाबा घराचा आधार अगदी बरोबर आहे....
माझ्या जीवनरूपी चित्रपटात नायिका म्हणून यशस्वी होण्यासाठी सगळ्यांचीच साथ आणि पाठिंबा मला आहे.... त्या चित्रपटाची दिग्दर्शक आहे आई...
सह कलाकार भाऊ...
वडिलांनी घरासाठी घाम गाळला... ते दमले... सुरकुत्या आल्या... तरी तसेच काम करत राहिले...
पोरासाठी जीव तोडत राहिले.. हाच तो लक्षात नसलेला बाप....
पण ज्याशिवाय दिग्दर्शक दिग्दर्शन नाही करू शकत अशे तंत्रज्ञ संकलक पडद्या मागचे सगळे कलाकार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निर्माता या सगळ्यांच्या भूमिकेत फक्त एकच व्यक्ती आणि ते म्हणजे
माझे बाबा...
मला त्यांचा अभिमान आहे......

anushka8264:
/can you send me a speech
Similar questions
Hindi,
7 months ago
Computer Science,
7 months ago
English,
7 months ago
Science,
1 year ago
Math,
1 year ago