majha anubhavlela paus .....essay in marathi pls its urgent
Answers
■■मी अनुभवलेला पाऊस.■■
तसे तर, माझ्याकडे पावसात भिजायच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. मला सगळ्यात जास्त आठवण असलेले, 'माझे पावसात भिजायचे अनुभव', हे गेल्या वर्षीचे आहे.
तेव्हा मी माझ्या मैत्रिणीसोबत गिरगाव चौपाटी फिरायला गेली होती. ते उन्हाळ्याचे दिवस होते .आम्ही दुपारी तेथे गेलो होतो.
जसजशी संध्याकाळ होऊ लागली, तसतसे थंड वारा वाहू लागला. ढग जोरजोरात गडगडू लागले आणि अचानक पावसाचा आगमन झाला.
पावसामुळे मातीचा सुगंध सगळीकडे पसरला. त्या पावसामुळे आम्ही सगळेच खूप खुश झालो. त्यामुळे आम्हाला गर्मीपासून सुटकारा मिळाला होता. आम्ही सगळे पावसात नाचू लागलो. तिथे उपस्थित सगळे लोकं आनंदाने पावसात भिजू लागले.
मी माझ्या मैत्रिणीच्या अंगावर समुद्राचे पाणी उडवू लागली. तिकडचे वातावरण मनाला प्रसन्न करण्यासारखे झाले होते. तिथे जवळच हातगाडीवर मका विकणारा होता. आम्ही तिथे गरमागरम मक्का खाला.
हळूहळू पाऊस वाढू लागला. तेव्हा, आम्ही तिथून घरी यायला निघालो.
तर, असा होता मी अनुभवलेला पाऊस.