India Languages, asked by deloise2002, 10 months ago

Majha avadata phal nibandh in marathi

Answers

Answered by Anonymous
17

Heyaa !!!

.

.

Hers ur essay :-

मला सगळेच फळ आवडतात पण मला सर्वात जास्त आवडणारा फळ म्हणजे आंबा .आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारं झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला ‘कोकणचा राजा’ असं म्हणतात. एप्रिल ते जून हा या फळाचा मोसम आहे. असं असलं तरी आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे सांगता येत नाही. दक्षिण अणि दक्षिण पूर्व आशियामध्ये मोठया प्रमाणात जैववैविध्य पाहता इथेच उगम झाल्याचं मानण्यात येतं.

आंब्याला भारताच्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. आंबा हे भारत आणि पाकिस्तान देशांचं ‘राष्ट्रीय फळ’ तर बांगलादेशचं ‘राष्ट्रीय झाड’ आहे आणि फिलिपाइन्सचं ‘राष्ट्रचिन्ह’ आहे. भारतात आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, फर्नाडिस, रायवळ इ. जाती आहेत. कच्च्या आंब्याला ‘कैरी’ असं म्हणतात, कैरीचा रंग साधारणपणे हिरवा असतो तर पूर्ण पक्व फळाचा रंग पिवळा, केशरी आणि लाल असा बदलता दिसून येतो.

ज्या बाजूला ऊन लागेल त्या बाजूला लाल रंग तर जी बाजू सावलीत असते तिथे पिवळसर रंग दिसतो. फळाच्या मध्यभागी चपटया, मध्यम आकाराची आणि लांबट कोय असते. आंबा हा वृक्ष सदारहित असतो. हे झाड अ‍ॅनाकार्डिएसी कुलातील असून त्याचं शास्त्रीय नाव मॅजिफेरा इंडिका आहे.

संस्कृतमध्ये ‘आम’ तर तमीळ भाषेत ‘मानके’ किंवा ‘मानगास’, इंग्रजीत ‘मँगो’ म्हणतात. आंब्याच्या गरात थायमीन, नायसिन, रिबोफ्लेवीन, पायरीडॉक्सीन असतं. तर खनिजांपैकी कॅल्शियम, तांब, लोह, मॅग्नेशियम, मॅगनीज आणि जस्त अधिक प्रमाणात असतं .

.

.

:-) :-) Hope it help's uh :-) :-)

:-) :-) Be brainly :-) :-)

:-) :-) Be happy :-) :-)

Similar questions