India Languages, asked by geethashetty15, 1 year ago

मला पंख असते तर in Marathi

Answers

Answered by gadakhsanket
53

नमस्कार मित्रा,

● मला पंख असते तर निबंध -

किती छान कल्पना आहे ना, मला पंख असते तर वाटेल तिथे फिरेल. मग मला कुठं जायला कुणाच्या परवानगीची गरज नाही. ना कसल्या वाहतुकीची गरज ना खड्यांची चिंता.

पंख घेऊन मी सर्व पृथ्वीभ्रमन करेल. किती सुंदर, बेधुंद जीवन असेल ना ते. कुणाची हुरहुर नसेल ना कुणाची कटकट. खूप मज्जा येईल.

कश्मीर ते कन्याकुमारी फिरता येईल. एवढाच काय तर अमेरिका, रशिया, इंग्लंड सगळीकडे जाईल मी.खरच हे स्वप्न एकदा पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे.

धन्यवाद...

Answered by ItsShree44
25

⠀⠀⠀⠀⠀⠀ जर मला पंख असते तर...

माझी ताई खूप दिवसांत आमच्याकडे आली नव्हती. मला तिची खूप खूप आठवण येत होती. तेव्हा मनात आले की, आपल्याला पंख असते, तर आपण उडत उडत ताईकडे गेलो असतो.

खरेच! मला उडता आले असते, तर किती मजा आली असती! पक्ष्यांप्रमाणे मस्तपैकी आकाशात उडत राहिलो असतो. उडता उडता दमलो असतो, तर एखाच्या झाडावर क्षणभर विसावलो असतो. झाडांशी, झाडांवरील पक्ष्यांशी खूप गप्पा मारल्या

असत्या.

मला पंख मिळाले तर मी खूप खूप प्रवास करीन. मला वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडते. प्रथम मी आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे पाहावयास सुरुवात करीन. मी महाराष्ट्रातील गड-किल्ले पाहून घेईन. महाराष्ट्रातील सर्व नदयांत पोहून घेईन. वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पदार्थांची लज्जत घेईन. पण मी भटकत भटकत खूप दूर गेलो तर? तर आईबाबा खूप वाट पाहतील, आजी-आजोबा काळजी करतील. पण नकोच, मी खूप लांब जाणारच नाही! मात्र मला। पंख हवेतच!

Similar questions