मला पंख असते तर मराठी निबंध, भाषण, लेख Mala Pankh Aste Tar Essay
Answers
मला पंख असते तर
खिडकीत एक चिमणी बसली होती. तिच्याकडे बघून सहज मनात विचार आला. मला पंख असते तर...
मला खरंच पंख फुटले तर खूप मज्जा येईल. मी चिमणीसारखी दिवसभर उडत राहिली असती. जेव्हा मन होईल तेव्हा भुर्र गेली असती.
जर मला पंख असते तर मी कोणत्याही वाहनांची वाट पाहिली नसती. जिथे जायचं असेल तिथे मी जाऊ शकली असती. ट्रॅफिक ची तर चिंता नसती. पंखांमुळे माझे आयुष्य सोपे झाले असते. आकाशात भरारी घेऊन मी वरून सर्वांची गम्मत पहिली असती.
खरंच, खूप बरं झालं असतं जर पंख असते मला.
⠀⠀⠀⠀⠀⠀ जर मला पंख असते तर...
माझी ताई खूप दिवसांत आमच्याकडे आली नव्हती. मला तिची खूप खूप आठवण येत होती. तेव्हा मनात आले की, आपल्याला पंख असते, तर आपण उडत उडत ताईकडे गेलो असतो.
खरेच! मला उडता आले असते, तर किती मजा आली असती! पक्ष्यांप्रमाणे मस्तपैकी आकाशात उडत राहिलो असतो. उडता उडता दमलो असतो, तर एखाच्या झाडावर क्षणभर विसावलो असतो. झाडांशी, झाडांवरील पक्ष्यांशी खूप गप्पा मारल्या
असत्या.
मला पंख मिळाले तर मी खूप खूप प्रवास करीन. मला वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडते. प्रथम मी आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे पाहावयास सुरुवात करीन. मी महाराष्ट्रातील गड-किल्ले पाहून घेईन. महाराष्ट्रातील सर्व नदयांत पोहून घेईन. वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पदार्थांची लज्जत घेईन. पण मी भटकत भटकत खूप दूर गेलो तर? तर आईबाबा खूप वाट पाहतील, आजी-आजोबा काळजी करतील. पण नकोच, मी खूप लांब जाणारच नाही! मात्र मला। पंख हवेतच!