India Languages, asked by patilvijayalaxmi57, 18 hours ago

ममतेने कोणते पुस्तक वयाच्या सातव्या वर्षी वाचले ?​

Answers

Answered by LIFEisGIFTfromGOD
0

Answer:

तीन पाकिस्तानी विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन करीत असताना  आठ हेरगिरी करणाऱ्या  उपग्रहांचा शोध लागतो. हेरगिरीसाठी हे आठही उपग्रह चीनने सोडलेले असतात. याची माहिती अमेरिकेला सुद्धा नसते. हे विद्यार्थी एक प्रोग्रॅम लिहून या उपग्रहांचा ताबा घेतात. हे केल्यामुळे चीनचे या उपग्रहावर असलेले नियंत्रण नष्ट होते. हे पाकिस्तानी विद्यार्थी संशोधक मग हे तंत्रज्ञान इच्छुक राष्ट्रांना विकायचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते आपल्या नायकाला, दलाल, ब्रोकर, म्हणून नेमतात. नायक आपल्या अजून एका मित्राला त्यासाठी सोबत घेतो. या मित्राची अधिक पैसे कमवायची हाव त्याच्या शेवटी मुळावर येते. सौदी अरेबिया हे तंत्रज्ञान प्रचंड मोठी रक्कम देऊन विकत घ्यायला तयार होतो. याचा सुगावा इस्त्रायलच्या मोसाद या संघटनेला लागतो. अरब राष्ट्राकडे तंत्रज्ञान गेले तर आपल्या सुरक्षेला धोका उद्भवतो म्हणून ते ताब्यात घेण्यासाठी मोसाद जगभर जाळे पसरते. तिकडे चीन सुद्धा आपल्या उपग्रहा वरचे गेलेले नियंत्रण परत मिळवायचा प्रयत्न करीत असतो. तिन्ही पाकिस्तानी विद्यार्थ्यांची चीनची गुप्तहेर संघटना हत्या करते. तसेच आपल्या नायकाच्या भागीदाराची सुद्धा हत्या करते. आपली सुद्धा हत्या होईल या भीतीने नायक सी.आय.ए. समोर शरणागती पत्करतो. सॉफ्टवेअर असलेल्या 4 सी.डी तो एका स्विस बँकेत लपवून ठेवतो. नायकाला पंचवीस वर्षाच्या कारावासाची शिक्षा होते. सी.आय.ए. ला मात्र त्या सीडी आता कोणाकडे आहेत व ते उपग्रह कोणत्या राष्ट्राने बनवले होते हे अजूनही समजलेले नसते. त्यासाठी सी.आय.ए. एक प्लान आखते. योजनेप्रमाणे नायकाला मावळते राष्ट्राध्यक्ष माफी जाहीर करतात. सी.आय.ए नायकाची रातोरात इटलीमधील एका गावात पाठवणी करते. शत्रू राष्ट्रांच्या हेर वर्तुळात, त्याला सोडून दिले आहे व तो कुठे लपला आहे हे ठिकाण सुद्धा पसरवते. आता चीन, इस्त्रायल व सौदी अरेबिया ही राष्ट्रे नायका कडून गुप्त माहिती काढण्याच्या व नंतर त्याला ठार करण्याच्या  मोहिमेवर त्या  गावी पोहोचतात. सी.आय.ए.चे हेर नायकाला मारायला कोण येतो आहे यावरून पुढची माहिती मिळवणार असतात. कथानकाची रंगत वाढवण्यासाठी यामध्ये अमेरिकेची एफ.बी. आय. सुद्धा येते. दोन अमेरिकी गुप्त संघटना मध्ये असलेले वैमनस्य, स्पर्धा व अविश्वास कथानकात रंगत आणते. जुन्या आणि नव्या सरकारांमध्ये असलेले राजकीय वैमनस्य सुद्धा यात रंग भरते.

आपला नायक मात्र या सर्व संघटनांना गुंगारा देऊन स्वित्झर्लंड येथे पोहोचतो !  स्विस बँकेत जाऊन तो आपल्या चारी सीडी ताब्यात घेतो.

या सीडी ताब्यात आल्यावर तो काय करतो ? जगभराच्या निष्णात हेरांना गुंगारा देण्यात यशस्वी होतो का ? त्या चार सीडी घेऊन नायक वॉशिंग्टनला पोहोचू शकतो का ? सीआयए बरोबर त्याच्या वाटाघाटी यशस्वी होतात का ? शेवट काय होतो ? हे सर्व रहस्य उलगडण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे !

रहस्यकथा भरपूर जाडजूड आहे पण एकदा वाचायला घेतली की ती खाली ठेवताच येत  नाही , अगदी गुंगवून टाकते ! अशोक पाध्ये यांचे मराठी भाषांतर अगदी ओघवते आहे व त्यामुळे मूळ इंग्रजी भाषेतील कादंबरीचा आस्वाद घ्यायला कोणताही अडथळा येत नाही !

या शिवाय ज्या गुप्तचर संघटनेची माहिती या पुस्तकात आली आहे त्या व इतर गुप्तचर संघटनेची पुस्तकं उपलब्ध आहेत.त्या घटना सत्य आहेत.

Explanation:

Similar questions