Social Sciences, asked by masajipandav2225, 5 months ago

मनिपुरीनृत्यप्रकार स्पष्ट करा.​

Answers

Answered by StudyKing941402
1

Answer:

मणिपुरी ही मणिपूर राज्यातील अभिजात भारतीय नृत्यशैली आहे.

कृष्णभक्ती हा या नृत्यप्रकाराचा मुख्य गाभा आहे. मणिपुरी शैलीचा उगम प्रामुख्याने पूजाविधी या स्वरूपात झाला. मणिपुरमध्ये वैष्णव पंथाच्या प्रसारासोबत या नृत्यास उत्तेजन मिळाले. पंधरावे ते अठरावे शतक हा मणिपुरी नृत्याच्या विकासाचा काळ मानला जातो. हे नृत्य शब्दाधारित असते.

प्रकार

मणिपुरी नृत्याची २ रूपे आहेत.

रास

राधा कृष्ण गोपी या विषयावरिल नृत्य

संकीर्तन

संकीर्तन हे प्रामुख्याने पुरुषांद्वारा  (पंग) नावाचे वाद्य घेऊन केले जाते.

१९१९ साली रवींद्रनाथ टागोर यांनी सिल्हेट येथील बिष्णुप्रिय़ा मणिपुरी लोकांचे नृत्य पाहिले. या नृत्याने प्रभावित होऊन त्यांनी याचे प्रशिक्षण शांतिकेतन येथे सुरू केले. त्यासाठी त्यांनी नीलेश्बर मुखर्जी, गुरु बुद्धिमन्त सिंह (त्रिपुरा) व गुरु सेनारिक सिंह राजकुमार (आसाम) यांना आमंत्रित केले.

Explanation:

I hope it's helpful for you.

Similar questions