India Languages, asked by s8on8ickubrs, 1 year ago

Mango tree information in Marathi

Answers

Answered by dainvincible1
437
आंबा वृक्ष भारतातील सर्वोत्तम ओळखले आणि सर्वात लोकप्रिय झाडे एक आहे. आंबा झाड शास्त्रिय नाव Mangifera इंडिका आहे. आंबा झाड काही फार मोठे आणि चवदार फळे देते. देशाच्या विविध भाषांमध्ये या लोकप्रिय झाड अनेक नावे आहेत. दोन्ही बंगाली भाषा आणि हिंदी भाषेतील, तो लोकप्रिय आम म्हणून ओळखले जाते. तेलुगूमध्ये, आंबा Mamid किंवा Mamada म्हणून ओळखले जाते; आणि तमिळ लोक Mangas किंवा मा म्हणून मला माहीत आहे. भारतात एक मूळ, आंबा झाड लोकप्रिय जवळजवळ सर्व उष्णदेशीय देशांमध्ये आढळले आहे. आंबा झाड सुगंधी फुले नाही तरी, अजूनही झाड हे त्याच्या पाने, झाडाची साल आणि आकार ओळखली जाऊ शकते. झाड वर्षभर सर्व पाने कायम करू शकता. साधारणपणे, हे झाड अतिरिक्त त्याच्या उंची मोठ्या प्रमाणात जसजसे. विशेष म्हणजे वारा सहज आंबा झाडांची पाने कठीण आणि उसळत्या stalks खंडित करू शकत नाही.
Answered by aryansonavane3682
8

Answer:

आंबा हा विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम असतो. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधे मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा जीवाश्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.

कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. कैरी ही नेहमीच चवीला आंबट असते, पण जर नसेल तर तिला खोबरी कैरी असे नाव आहे. आंबा फळाचा राजा आहे.

दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत सजावटीसाठी वापरतात. आंबा हे भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे. [१]

जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते. भारतात आंब्याच्या जवळपास १३०० जातींची नोंद आहे. परंतु २५ ते ३० जाती या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. नीलम व हापूस यांच्या संकरीकरणातून कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केली आहे. गुजरात राज्यातील केशर हे वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. दक्षिण भारतातील तोतापुरी, आंध्रप्रदेशामध्ये बैंगणपल्ली, उत्तर प्रदेशामध्ये दशेरी, लंगडा, दक्षिणेत नीलम, पायरी, मलगोवा या जाती प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त संशोधन केंद्राने दशेरी व नीलम यांच्या संकरामधून आम्रपाली आणि नीलम व दशेरी यांच्या संकरामधून मल्लिका ही जात विकसित केली आहे. कोकण विद्यापीठाने बिनकोयीची सिंधू ही जात विकसित केली आहे.

अनुक्रमणिका

१ संशोधन केंद्र

२ आंब्याचे झाड

३ आंब्याची आढी

४ धार्मिककार्य

५ नक्षत्र

६ आयुर्वेद

७ उपयोग

८ आंब्याच्या जाती[३]

९ संदर्भ यादी

१० हे सुद्धा पहा

संशोधन केंद्र

आंबा संशोधन केंद्र भारतामध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे आणि महाराष्ट्रातील वेंगुर्ला येथे आहे.

आंब्याचे झाड

आंब्याचे झाड (Mangifera Indica) हे साधारणपणे ३५ ते ४० मीटर उंच असते. त्याचा घेर साधारणपणे १० मीटर एवढा असतो. आंब्याची पाने सदाबहार असून पाने डहाळीला एकाआड एक येतात. आंब्याचे पान १५ ते ३५ सेंटिमीटर लांब तर ६ ते १६ सेंटिमीटर रुंद असते. कोवळी असताना पानांचा रंग हा काहीसा केशरी-गुलाबी असतो व तो जलदपणे उजळ आणि गडद लाल होतो. पाने जशी मोठी होतात तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो. आंब्याची फुले १० ते ४० सेंटिमीटर लांबीच्या गुच्छामध्ये येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिलिमीटर एवढी असते. आंब्याच्या फुलांना मोहोर असे म्हणतात. मोहोराला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंब्याचे फळ हे वनस्पतीशास्त्रातील "अश्मगर्भी फळ" ह्या प्रकारातील असते. ह्या प्रकारात फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमध्ये कडक कवच असते आणि ह्या कवचाच्या आत फळाचे बी असते. ह्या कवचाला आंब्याची कोय असे म्हणतात. आंब्याच्या जातीप्रमाणे त्याच्या फळांच्या आकारात बराच फरक असतो. साधारणपणे आंब्याच्या फळाचा आकार १० ते २५ सेंटिमीटर लांब तर व्यास ७ ते १२ सेंटिमीटर असतो. आंब्याचे फळाचे वजन ५ किलोग्रॅम पर्यंत असू शकते. कच्च्या आंब्याला कैरी असे म्हणतात. कैरीचा रंग साधारणपणे हिरवा असतो. पूर्ण पक्व फळाचा रंग पिवळा, केशरी आणि लाल असा बदलता दिसून येतो. ज्या बाजूस ऊन लागेल तिथे लाल छटा जास्त दिसते तर सावलीच्या बाजूस बहुतकरून जास्त पिवळी छटा असल्याचे आढळते. फळाच्या मध्यभागी चपट्या आकाराची आणि लांबट बी (कोय) असते. आंब्यांच्या जातीप्रमाणे कोयीचा पृष्ठभाग हा धागेदार अथवा सपाट असतो. कोयीचे कवच १ ते २ मिलिमीटर जाड असून त्याच्या आत अतिशय पातळ असे आवरण असते ज्यात ४ ते ७ सेंटिमीटर लांबी, ३ ते ४ सेंटिमीटर रुंदी आणि १ सेंटिमीटर जाडीचे एकच बी असते. कच्च्या कैरी चवीला आंबट असते. कैरी पिकल्यावर गोड लागते. आंबा भारतात सर्व ठिकाणी आढळून येते. त्याचा वापर विविध प्रकारे करता येतो.

Similar questions