मराठी bhashechi shrimanti
Answers
मराठी भाषेची श्रीमती
मला एकदा एका
इंग्रजाळलेल्या माणसाने
हिणवण्याच्या स्वरात म्हटलं
"अरे काय त्या मराठीत
टाइप करता रे तुम्ही...
किती वेळ लागतो...!
बोअरिंग काम... .
इंग्रजित कसं पटापट
टाईप होतं...
तुमचं मराठी म्हणजे....."
मी त्याला सांगितलं,
"अरे बाबा श्रीमंत आणि
गरिबामध्ये तेवढा फरक असणारच".
तो खुश होऊन म्हणाला
"चला म्हणजे मराठी गरीब
हे तू मान्य केलंस तर"??
मी म्हटलं
"मित्रा चुकतोयस तू..
इंग्रजी भाषेत वर्णाक्षरं किती..?"
तो म्हणाला २६..
मी म्हटलं
"मराठीत याच्या दुप्पट
५२ आहेत...
इंग्रजिच्या दुप्पट
मालमत्ता आहे आमची..
आता सांग,
कोण गरीब आणि
कोण श्रीमंत?
केवळ जीन्स घालून बाहेर
पडणारी स्त्री पटकन
तयार होऊ शकते..
पण भरजरी कपडे घालून
सर्व दागदागिने धालून
बाहेर पडणारी स्त्री
जास्त वेळ घेणारच..
आमची मराठी भाषा
काना, मात्रा, वेलांट्या,
उकार यांचे दागदागिने
घैऊन समोर येते..
म्हणुनच ती समोर आल्यावर
तिला यायला लागणारा वेळ
कोणी बघत नाही,
तिचं सौंदर्य बघूनच सर्व
धन्य होतात"
मराठी - अलंकारीत भाषा आहे!
या लेखाला सलाम
Mark me as brainlist__"__"__!!!!!!