मराठी कठियावादी लेकिन महत्वाचा कामगिरी पोस्ट करें मराठी कथेच्या वाचली तीन महत्वाचा महत्वाचा कथा कारण ची कामगिरी स्पष्ट करें
Answers
Answer:
कथात्मक साहित्याचा एक प्रकार. कथेचे कथन-श्रवण वा लेखन-वाचन ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने हा अत्यंत प्राचीन साहित्यप्रकार आहे. कथेची ही प्राचीन परंपरा अनेक प्रकारची उद्दिष्टे व तदनुषंगाने आलेली आशय-अभिव्यक्तीची अनेकविधता ह्यांनी संपन्न आहे. आधुनिक काळात, म्हणजे गेल्या शतकातच कथेची लघुकथा झाली व आज कथा म्हणजे लघुकथा असेच सामान्यतः मानले जाते. एक कथात्मक साहित्याचा प्रकार म्हणून कादंबरी आणि कादंबरिका यांच्याशी लघुकथेचे जवळचे नाते आहे.
अनेकत्वातून एकत्व व्यक्त करणे, हा जीवनाप्रमाणे सर्वच कलांचा धर्म आहे. तोच कादंबरी व लघुकथा ह्यांतही गोचर होतो. फरक आहे तो केवळ दोहोंतून व्यक्त होणाऱ्या अनेकत्वाच्या प्रमाणात. लघुकथा ज्या अनेकत्वातील एकत्व प्रगट करीत असते, त्याचे प्रमाण कादंबरीमधून व्यक्त होणाऱ्या अनेकत्वापेक्षा स्वाभाविकच कमी असते. हा फरक म्हणजे बिंदू आणि सिंधू ह्यांतील फरकासारखा आहे. कथात्मक साहित्याचे असे अनेक घटक आहेत, की ते ह्या सर्वांना समान आहेत.
कादंबरीप्रमाणे कथेला विशिष्ट कालक्रमाने घडलेल्या घटनांचे बनलेले कथानक असते, ज्यांच्या संदर्भात ह्या घटना घडल्या ती पात्रे असतात, ज्या स्थळी व काळी त्या घडल्या तो स्थळकाळ असतो, त्या घटनांशी संबद्ध अशा भाववृत्तीने निर्माण केलेले एक वातावरण असते, निवेदक कोण, घटनांशी संबंधित असलेली एक व्यक्ती की एक तिऱ्हाईत व्यक्ती, ह्यामुळे अगदी स्वाभाविकपणे निश्चित झालेली निवेदनशैली असते, पात्रांच्या व घटनांच्या परस्परसंबंधांतून निर्माण झालेले ताण, संघर्ष, गुंतागुंत ही असतात, त्यांचा उत्कर्षबिंदू असतो आणि कथेच्या शेवटी एका अर्थाने त्यांचा उपशमही होत असतो. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्परसंबंधांतून घडलेल्या घटनांचे एका दृष्टिकोणातून केलेले चित्रण म्हणजे लघुकथा, अशी लघुकथेची चालचलाऊ व्याख्या करता येते.
प्रत्येक लघुकथेत हे घटक असले, तरी त्यांचे प्रमाण सारखेच नसते. प्रत्येक लघुकथालेखकाची प्रकृती वेगळी व प्रत्येक लघुकथेची प्रकृती वेगळी. एखाद्या कथेत घटनांमधून आकारलेल्या कथानकापेक्षा पात्रांकडेच आपले लक्ष अधिक जाते, तर दुसरीत पात्रांपेक्षा घटनात्मक कथानकच आपल्या डोळ्यांत अधिक भरते. एखादी कथा अशीही असू शकते, की तिच्यात ज्या दृष्टिकोणातून एका घटनावलीचे चित्रण झालेले असते, तो दृष्टिकोणच आपले लक्ष विशेष वेधून घेत असतो. लघुकथा अशी विविध रूपांमधून अवतरत असल्यामुळे वाङ्मयाचे जे इतर काही प्रकार आहेत,त्यांच्यापासून ती वेगळी करणे अनेकदा जड जाते.
लेखक ज्या दृष्टिकोणातून लेखन करीत असतो, त्यालाच वाचकाच्या दृष्टीने एखाद्या लघुकथेत जेव्हा खूप महत्त्व येत असते, तेव्हा ती अनेकदा निबंध वा ललितनिबंध ह्यांच्याजवळ सरकलेली असते; परंतु जोपर्यंत ती एका विशिष्ट कालखंडात एका किंवा अनेक व्यक्तींच्या संबंधात घडलेल्या घटनांचे चित्रण करीत असते, तोपर्यंत तिचे कथात्व अभंगच राहते. लघुकथा म्हणजे केवळ एक प्रसंगचित्र वा घटनाचित्र नव्हे; लघुकथा म्हणजे केवळ एक व्यक्तिचित्रही नव्हे आणि लघुकथा म्हणजे केवळ एका घटनावलीचे कालानुक्रमाने केलेले निवेदनही नव्हे. लघुकथेत व्यक्तिचित्रण हे व्यक्तिचित्रणासाठी नसते;
Explanation:
hope it helps you bro have a great day