India Languages, asked by arjunsaneesh8358, 11 months ago

मराठी में 20 लाइन कविता

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

मी इथे अन तू तिथे असे

किती दिवस चालायचं

स्वप्ना स्वप्नातच तुझ्यारे

असे कितींदा रमायचं।।१।।

स्वप्न पाहता चहूकडे माझे

नेत्र शोधत असती रे तुला

परंतू तू नसतो सोबतिला

विचार करता लाज येई मला।।२।।

तुझे स्वप्न पाहिले मी सदा

भास ही होतोय दिवा स्वप्नात

उगाच पडले रे तुझ्या प्रेमात

वाटे मजशी या संसारात ।।३।।

समोर ये स्वप्नातूनी सख्या

पुरे कर ना रे हे बहाणे

नाही तर बंद कर तूझे

स्वप्नामधले येणे जाणे ।।४।।

आठवणी या स्वप्नातिल

गोडवा देती रे सदा मनी

आनंदानं फुलतोय बहर

अशी न्हाते मी तनीमनी ।।५।।

स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते

असा वागशिल माझ्या जीवनी

मी न राहिली माझी आता

तुझा धावा प्रत्येक क्षणी।।६।।

Similar questions