मराठी महिने लिहून त्या महिन्यात येणारा सणाचे नाव लिहा व त्या सणाची चार ते पाच वाक्यात माहिती लिहा.
Answers
Answer:
मराठी महिने चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन.
Explanation:
सण आणि उत्सव
अनंत चतुर्दशी
अनंत चतुर्दशी : भाद्रपद शुद्ध चतुर्दशी हा अनंतपूजेचा दिवस, एक व्रत व उत्सव म्हणून साजरा करतात. वनवासामध्ये पांडवांनी श्रीकृष्णाची प्रार्थना केली, तेव्हा कृष्णाने त्यांना हे अनंतव्रत, इच्छित-फलदायक म्हणून करण्यास सांगितले.
अभिनव होळी
भारत हा जसा विविधतेनं नटलेला देश आहे. तसा तो वेगवेगळे सण-उत्सव साजरा करणारा देश म्हणूनही ओळखला जातो.
इकोफ्रेंडली रंगपंचमी…
रंग ही होळीची अलिकडे झालेली ओळख. परंतु होळीसह रंगपंचमीचा खरा अर्थ जो समजून घेईल तो नक्कीच पर्यावरणपूरक होळीचा, रंगपंचमीचा पुरस्कर्ता ठरेल.
कुंभमेळा
‘कुंभपर्व’ नावाच्या पुण्यकारक ग्रहयोगाच्या निमित्ताने दर बारा वर्षांनी चार तीर्थक्षेत्रांच्या स्थानी हिंदू भाविकांचा जो मेळावा जमतो, त्यास कुंभमेळा म्हणतात.
कुंभमेळा : कुंभ पर्व चक्र
जगभरातुन लाखोंच्या संख्येने भाविक व साधू कोणतेही आमंत्रण,बोलावणे इत्यादी नसतांना पवित्रा नदयांकाठी एकत्र येवून संपन्न होणारा ज्ञान व आध्यामिकतेचा सोहळा म्हणजे कुंभमेळा.
कुंभमेळा : परिचय
आध्यात्मिकतेपोटी मोठया संख्येने भाविक व साधू एकत्रित येण्याचा कुंभ सोहळा भारतात नाशिक- त्र्यंबकेश्वर, प्रयाग (अलाहाबाद), हरिदवार, उज्जैन या ठिकाणी पवित्र नदयाच्या तीरावर दर बारा वर्षांनी संपन्न होतो.
कोजागरी पौर्णिमा
शरद ऋतूतील आश्विन महिना. आश्विन महिन्यातील आश्विन पौर्णिमा म्हणजेच "कोजागरी पौर्णिमा" किंवा "शरद पौर्णिमा". ह्या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात तर कुणी कौमुदी पौर्णिमा देखील म्हणतात.
ख्रिसमस (नाताळ)
नाताळ किंवा ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मियांचा एक महत्वपूर्ण सण आहे. २५ डिसेंबर, येशुंचा जन्मदिवस - दरवर्षी याच दिवशी नाताळाचा सण साजरा करण्यात येतो.
गुढी पाडवा
हिंदू वर्षांतील पहिला दिवस गुढी पाडव्यापासून सुरु होतो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो.
गुरुपौर्णिमा
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव-देवता ह्यांना जितके महत्त्व आहे, त्यापेक्षा थोडे अधिक महत्व आहे ते गुरूला. गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो.
गोकुळ अष्टमी
गोकुळाष्टमी : श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला, म्हणून हा दिवस कृष्णजयंती, जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो. देवकीच्या उदरी कृष्णाचा जन्म होताच वसुदेवाने कंसभयास्तव रातोरात कृष्णाला गुप्तपणे गोकुळात नंदयशोदेकडे पोहोचविले.
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला !
गोडवा माणसं एकत्र येण्याचा, गोडवा त्या सणाच्या पावित्र्याचा, गोडवा पतंगाने नटलेल्या त्या आकाशाचा तर गोडवा तिळगुळाचा.
दसरा
दसरा म्हणजेच विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस.
दसरा
दसरा : हिंदूचा एक प्रमुख सण व शुभ दिवस. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचे ⇨नवरात्र असते. याची समाप्ती या दिवशी होते. शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला व नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले.
दिवाळी
दिवाळी : हिंदूंचा एक प्रसिद्ध सणं. आश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात. म्हणूनच दिपावली किंवा दिवाळी या .
नागपंचमी
नागपंचमी : श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात, म्हणून या दिवसास ‘नागपंचमी’ म्हणतात. भारतातील हा एक महत्त्वाचा सण आहे. कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केले व या दिवशी तो डोहातून विजयी होऊन वर आला.
पोळा
श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सण म्हणजे 'पोळा.' या सणाला "बैलपोळा" असेही म्हणतात.