History, asked by Atharva7th8, 2 months ago

मराठी महाराष्ट्रातील पाच स्त्री समाजसुधारकांची माहिती​

Answers

Answered by sakshishinde042003
4

Answer:

रमाबाई रानडे (जानेवारी २५, इ.स. १८६२ : देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत – २६ एप्रिल, इ.स. १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या.

ताराबाई शिंदे यांचा जन्म इ.स. १८५० साली व मृत्यू इ.स. १९१०मध्ये झाला. ह्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत. १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री--पुरुष तुलना या पुस्तकाच्या त्या लेखिका होत्या.

सावित्रीबाई जोतीराव फुले (३ जानेवारी, इ.स. १८३१ - १० मार्च, इ.स. १८९७) ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाले.

पंडिता रमाबाई : (२३ एप्रिल १८५८–५ एप्रिल १९२२). स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्ता, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी. लक्ष्मीबाई ऊर्फ पंडिता रमाबाई त्यांचे हस्ताक्षर व स्वाक्षरीअंबाबाई आणि अनंतशास्त्री डोंगरे हे त्यांचे माता-पिता. तेव्हाच्या म्हैसूर संस्थानातील मंगलोरजवळ माळहेरंजी येथे राहणाऱ्या ह्या चित्‌पावन ब्राह्मण दांपत्यापोटी माळहेरंजी जवळील गंगामूळ नावाच्या डोंगरावरील वस्तीत रमाबाईंचा जन्म झाला. अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. लक्ष्मीबाईंस व रमाबाईंस त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. तसेच रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले. रमाबाईंच्या जन्मानंतर सहा महिन्यांतच आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे सर्व मुलांना घेऊन तीर्थयात्रेला पायी निघावे लागले. या तीर्थयात्रेच्या १५-१६ वर्षांच्या कालखंडात रमाबाईंना आई-वडिलांपासून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले.

Similar questions