मराठी निबंध
» पुस्तकाचे आत्मकथन
Whoever will answer, I'll mark BRAINLIEST.
(LONG ESSAY)
Answers
Answer:
एके दिवशी मी माझे कपाट स्वच्छ करीत होतो. माझ्या आजूबाजूला अनेक पुस्तके पडली होती. त्यातच मला एक जुने पुस्तक मिळाले ज्यात महान भारतीयाचा इतिहास लिहिलेला होता. त्या पुस्तकाची स्थिती खराब होती. मी त्याला स्वच्छ करून वाचतच होतो इतक्यात पुस्तक बोलू लागले. मी थोडा घाबरलो हे कसे शक्य आहे. पण त्याने मला धीर देत म्हटले, "घाबरू नकोस, मला तुझ्याशी फार दिवसांपासून बोलण्याची इच्छा होती मी तुला माझी आत्मकथा सांगू इच्छितो."
पुस्तक मला सांगू लागले माझा जन्म एका कारखान्यात झाला होता माझ्या पानावर महान भारतीयाचा इतिहास लिहिलेला आहे. मला या गोष्टीचा फार अभिमान आणि आनंद देखील होता. या नंतर मला एका वाचनालयात पाठवण्यात आले वाचनालय मध्ये असताना मला वाटायला लागले कि माझ्या पानांवर छापलेला इतिहास वाचण्यासाठी लोक पळत येतील, परंतु असे काहीही झाले नाही. लोकांना माझ्यात असलेल्या इतिहासात सारस्य नव्हते. मग काय मी वर्षानुवर्षे धूळ खात पडून राहिलो. मी वाट पाहत होतो कि कोणीतरी येऊन मला नेईल.
शेवटी मला वाटायला लागले कि माझे आयुष्य याच वाचनालयात धूळ खात संपून जाईल. तेव्हाच मला शोधत तू आला, मला खूप आनंद झाला. तू मला घरी घेऊन आला व माझ्या पानांवर छापलेला इतिहास मोठ्या आनंदाने वाचू लागला. मी पुन्हा आनंदित झालो मला वाटायला लागले कि मला खूप चांगला मालक मिळालेला आहे.
माझ्या इच्छेनुसार काही दिवस तर तू मला अतिशय मन लावून वाचले. पण त्यानंतर तू मला एका टेबलावर ठेऊन विसरून गेलास. तेथे माझ्यावर पाणी पडले. मी ओला झालो, पण तुझे माझ्यावर लक्ष नव्हते. तुझ्या आईने स्वछता करीत असताना मला उचलून कपाटाच्या वर ठेऊन दिले. तेव्हा पासून तर आजपर्यंत मी तेथेच पडलेलो होतो.
मला खूप वाईट वाटत होते. तेथे पडून पडून माझे पाने मोकळे होऊ लागले. मला वाटले कि लवकरच माझा अंत होईल. पण आज तू येऊन मला वाचवले. पुस्तकाला एका गुरु प्रमाणे मानले जाते. ज्याप्रमाणे तू आपल्या गुरूचा सम्मान करतो त्याच प्रमाणे माझा तसेच इतर पुस्तकाचा पण सम्मान करत जा. जर तू मला वाचून संपवले असेल तर मला आपल्या मित्रांना भेट देऊन त्यांचेही ज्ञान वाढव.
पुस्तकाने माझ्याशी साधलेल्या या संवादानंतर मी देखील पुस्तकांची योग्य देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला.
Explanation:
Hope this helps you
Answer:तिने मला तिच्या हँडबॅगमध्ये घरी नेले म्हणून मला खूप आनंद झाला. तिने मला तिची मुलगी भेट दिली, जी एक सुंदर लहान मुलगी होती.
तिला मला वाचून खूप मजा आली. तिने माझ्या पहिल्या पानावर तिचे नाव लिहिले आणि मला नेहमी तिच्यासोबत नेले. मी खूप आनंदी होते.
एके दिवशी, मी तिच्या बॅगमध्ये असताना, एक दुष्ट मुलगा वर्गात आला आणि त्याने मला चोरले. ब्लेडने ओरबाडून त्याने तिचे नाव मिटवले. मला यामुळे खोलवर चेंडू पडले आणि मला खूप वेदना झाल्या. त्या मुलाला माझ्यात रस नव्हता. त्याने मला एका दुकानातील एका माणसाला अगदी कमी किमतीत विकले जे सेकंडहँड पुस्तके विकतात.
काही दिवसांनी दुसरा मुलगा आला आणि मला विकत घेऊन आला. त्याने मला घरी नेले आणि तपकिरी कागदाने छान झाकले. खूप दिवसांनी मला आनंद आणि दिलासा वाटला. त्यानंतर त्यांनी माझे नाव लिहिले. एक दिवस, तो मला वाचत असताना, त्याचा मोठा भाऊ खोलीत आला. त्याने मला त्याच्या हातातून हिसकावून घेतले आणि मला एका कमरमध्ये फेकले. या प्रक्रियेत मला खूप दुखापत झाली आणि जखम झाली. तो मुलगा माझ्या भावाला वाचून ओरडला आणि निघून गेला.
सुरुवातीला लहान मुलगा खूप रडला. मग, त्याने मला खूप प्रेमाने उचलले आणि माझी पाने गुळगुळीत केली. मला आनंद झाला आणि पुन्हा आराम मिळाला. त्याने मला त्याच्या ड्रॉवरमध्ये लपवले आणि मला सुरक्षित ठेवले. अधूनमधून तो मला वाचनासाठी बाहेर घेऊन जातो. आता खूप दिवसांपासून मी त्याच्यासोबत आहे. मला थोडे म्हातारे वाटते पण आनंदी आहे कारण तो माझी चांगली काळजी घेतो.
Explanation:i hope it is helpful