मराठी निबंध: शाळा बंद झाल्या तर pls its urgent
Answers
Answer:
above is the answer of if school were closed written in marathi
Answer:
शाळा विद्येचे माहेर घर आहे. शाळेमुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळते. आपल्या ज्ञानात भर पडते. शाळा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. पण शाळा बंद झाल्या तर खूप अडचणी निर्माण होऊ शकतात.
शाळा बंद झाल्या तर मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. शाळाच नसल्या तर मुलांचा बौद्धिक विकास होणारच नाही. शाळेमध्ये मुलांना शिकवणुकीचे धडे मिळतात. शाळा नसली तर ते धडे कुठून मिळणार. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवाद होणारच नाही.
प्रत्यक्षात शाळेत जाऊन शिकणे. यामध्ये वेगळीच मजा आहे. पण जर शाळाच नसली तर मुले चांगले मित्र मैत्रीण गमावून बसतील. वक्तृत्व स्पर्धा, नृत्य, संगीतगायन, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, कला क्रीडा, अशा स्पर्धांना मुले मुकतील. त्यांचा सर्वांगीण विकास होणार नाही. आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा ते कमकुवतच राहतील. धावण्यामुळे पळल्यामुळे मुलांचे शरीर सुदृढ राहते. पण तेच जर घरात बसून राहिले तर शरीर स्थूल होऊ शकते. जे शरीरास हानिकारक आहे.
करोनाच्या काळात आपण बघितले शाळा बंद होत्या. मुले मोबाईल वरती शिक्षण घेत होती. जरी मुले मोबाईल वर शिकत असली. तरी पूर्णपणे त्यांचा विकास होत नव्हता. मोबाईल समोर ते फक्त बसलेले असायचे पण शरीराने मात्र दुसरीकडेच भरकटत होते. म्हणून शाळा आणि मोबाईल वर असलेली शाळा यामध्ये फरक आहे. म्हणून शाळेत जर बंद राहिल्या तर मुलांचे आयुष्य त्यांच्यापासून आपण हिरावून घेतले असे होईल.