मराठी निबंध वाचनाची आवड
Answers
आमच्या शाळेत वाचनालय होते. जेवनाच्या सुट्टीत, खाली तासात आम्ही मित्र तिथे जायचो व जे मनाला वाटेल ते वाचायचो. कधी वर्तमान पत्र तर कधी मासिक. यामुळे वाचनाची ओढ वाढतच गेली.
वाचनालयातून आम्हाला प्रत्येक आठवळ्यात दोन गोष्टींच्या पुस्तका मिळायच्या. ती वाचून त्या गोष्यीचा सारांश आम्हाला आमचे सर वर्गात विचारायचे. आणि त्याकरता आम्ही गोष्टीच्या पुस्तका वाचायला शिकलो आणि तोच माझा छंद झाला असेल कदाचित.
माझ्या या वाचनाचा छंद बाबांना कळला व त्यांनी मग गावातील सार्वजनिक वाचनालयात देखील माझ्या नावाचा खाता उघडला. मग काय, नेहमी माझ्या हातात पुस्तकच दिसायला लागले. पण या छंदामुळे मी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही केलय. आधी शाळेचा अभ्यास संपवायचा आणि मग जे हव ते वाचायच.
वाचनाचा छंदामुळे मला कधीच कंटाळा येत नाही. प्रवासात जाताना तर पुस्तकच माझे सोबती असतात. या छंदामुळे मला जगात घडत असणारी सर्व घटनांची माहिती मिळते. माझा ज्ञानात ही वृद्धी होत असते.
माझ्याकडे सर्वप्रकारच्या पुस्तकांचा संग्रह झालेला आहे. त्यात गोष्टीच्या पुस्तका, मासिक, कांदबरी व खुप काही वाचन सामग्री आहे. मला केवळ मराठीतील नाही तर हिंदी व इंग्रजी पुस्तक सुद्धा वाचायला आवडते.
.
.
Hope its helpful
⠀⠀⠀⠀⠀⠀ वाचनाची आवड
वाचन हा एक चांगला छंद आहे. वाचनाने चांगली करमणूक होते. ज्याला वाचनाची आवड असते, त्याला कधीच कंटाळा येत नाही. प्रवासात पुस्तकाची चांगली सोबत होते. म्हातारपणीही वाचन हे खूप मदत करते. त्यामुळे म्हातारपणाचे दिवस कंटाळवाणे वाटत नाहीत.
वाचनाने ज्ञानप्राप्ती होते. वाचनाने खूप गोष्टींची माहिती होते. पूर्वीच्या काळात कोण कोण राजे होते, त्यांनी काय काय पराक्रम केले, हे इतिहासाची पुस्तके सांगतात. महापूर, दुष्काळ, भूकंप अशा नैसर्गिक संकटांत किंवा लढाया, आक्रमण अशा मानवांनी आणलेल्या संकटांत ती माणसे कशी वागली होती, ते आपल्याला ग्रंथवाचनातूनच कळते.
वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी माणसे आपली आत्मचरित्रे लिहून ठेवतात. काही माणसे इतर मोठ्या माणसांची चरित्रे लिहून ठेवतात. ही चरित्रे आपण वाचली, तर आपल्याला खूप शिकायला मिळते. काव्याची पुस्तके वाचल्यावर आपल्याला खूप आनंद मिळतो. सुंदर सुंदर कविता आपल्या ओळखीच्या होतात. पण या सगळ्यासाठी हवी वाचनाची आवड!