India Languages, asked by himanshukumar104, 1 year ago

मराठी दिन २७ फेब्रुवारी २०१९ माझी मायबोली मराठी माहिती, निबंध...

Answers

Answered by thearon
14

Answer:

मराठी भाषा आमची मायबोली.म्हणजेच मातृभाषा.लहान मुलं जन्मल्यापासून आई जवळ असते.तेव्हा ती जी भाषा बोलते ती मुलाची भाषा होणे स्वभाविकच आहे.महाराष्ट्राची प्रत्येक भाषा प्रत्येक प्रातांची निराळी.ती तेथील लोकांची होते आणि ती आवडते.आपली मराठई भाषा संस्कृत भाषेतून आली.तशा भारतातल्या अनेक भाषा संस्कृत भाषेतून आल्या.आपली मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची एक असली तरी ती दर बारा कोसावर बडलते.लेखी भाषा तीच असली तरी बोलीभाषेत फरक पडतो.तिचे हेल वेगळे होतात.मराठी भाषेतसुद्धा असे वेगवेगळे प्रकार होतात.कोकणातील कोकणी,घाटावरची म्हणजे देशावरची वेगळी,घाटी भाषा वेगळी,वरहाडी भाषा वेगळी मध्यप्रांतातील,मध्यप्रदेशातील हिंदी मिश्रित आणि गोव्या कडील कोकणी वेगळी असते.

मराठी भाषा लवचिक आहे थोड्या थोड्या फरकाने अर्थ बदलतो.मुंबईची मराठी भाषा म्हणजे खिचडी भाषा झाली आहे.शुद्ध मराठी राहीली नाही.तिच्यात हिंदी,मराठी,इंग्रजी यांची भेसळ झाली आहे.हींदी आणि इंग्रजी सिनेमे पाहून अशी भाषा झाली आहे.पुर्वी मराठी भाषेला राजभाषेचा मान नव्हता.पण आता काही प्रमाणात आहे.

आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असतो.ण अलिकडे तरुणांना इंग्रजी भाषेचे जास्त आकर्षन ! त्यात त्यांचा दोष नाही.कारण त्यांच महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण सर्व इंग्रजीतून बोत असतं.पदव्या मिळवून तरुण मंडळी उच्च शिक्षणासाठी परदेशात जात असतात.तिथे इंग्रजी भाषाच बोलावी लागते.सहाजिकच त्या भाषेचे संस्कार घडत असतात.त्या विकसित देशात आपल्या लोकांना जास्त पगार भारतातील लोकांपेक्षा जास्त प्रमाणात मिळतो.त्यामुळे त्यांना तिकजडे राहणे सुखाचे होते.त्यांचे संसार तिथेच होतात.त्यामुळे त्या मुलांची मायबोली तिकडचीच होते.हा विषय जरी वेगळा असला तरी मराठी भाषेवर,राहणीवर,आचार विचारांवर खूपच फरक होतो.त्याचं शिक्षणही तिकडेच होते.त्यामुळे मराठीचा त्यांना ग्रंथ,माहीती वार्ता नाही.संस्कारही तिथलेच राहण्यामुळे होते.पण भारतात राहणा-या तरुणांना आपल्या भाषेचा अभिमान नाही आणि त्यांना स्वतःचे कौतूकही वाटते.तेव्हा तुम्ही शिकून मोठे व्हा.उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले तरी हरकत नाही.पण काम झाल्यावर परत आपल्या भारतात या महाराष्ट्राला आपल्या ज्ञानाचा,अनुभवाचा फायदा करुन द्या.परभाषा जरी अवगत झाली आणि परदेशात गेलात तरी आपल्या मराठीला विसरु नका.प्रत्येक मराठी माणसाला मराठी बोलता वाचता आली पाहीजे.आपल्या मराठीत सुद्धा खूप विषयावर लिखान झाले.शास्त्र,विज्ञान,ललित साहीत्य खूप आहे.परदेशातून स्वदेशात येण्यासाठी ‘सागरा प्राण तळमळला’ वि.दा.सावरकरांची आठवण ठेवा.

Answered by fistshelter
19

Answer:जगभरातील मराठी माणसे दर वर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस साजरा करतात. महान मराठी कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचं जन्मदिसावाच्या निमित्ताने हा दिवस “मराठी भाषा दिन” म्हणून साजरा केला जातो.

मराठी ही एक खूप सुंदर भाषा आहे जी मुख्यता महाराष्ट्रात आणि थोड्या प्रमाणात गोवा इथे बोलली जाते. मराठी ही भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी भाषा ही भारतात सगळ्यात जास्त बोलली जाणारी चौथी भाषा आहे. मराठीच्या तश्या ४ मुख्य पोटभाषा आहेत,त्या म्हणजे वऱ्हाडी, कोळी, मालवणी आणि कोंकणी. मराठी भाषा २००० वर्षांपासून अस्तित्वात आहे, म्हणूनच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न चालू आहे.

परंतु आजकाल जनतेचा ओढा आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याकडे आहे. त्यामुळे पुढील पिढीला मातृभाषेचा विसर पडत चालला आहे. इंग्रजी भाषा ही जागतिक पातळीवर महत्त्वाची असल्याने तिचे ज्ञान आवश्यक आहेच पण त्याबरोबरच आपल्याला आपली मातृभाषा सुद्धा तितक्याच सफलतेने बोलता यायला हवी. किंबहुना आपल्याला मराठीचा जाज्वल्य अभिमान असायला हवा. संत ज्ञानेश्वरांनी 'अमृताहूनही गोड' असे मराठीला उगाच म्हटले नाही. मराठी साहित्यात अपार ताकद आहे. ते समजून घेण्यासाठी मराठी भाषा जतन करायला हवी.

Explanation:

Similar questions