India Languages, asked by christinangelforever, 8 months ago

Marathi -Activity


* Topic - Ghats in Maharashtra




* Take any one of the ghats in Maharashtra, write information on it and just put a picture and keep the activity ready



Can someone do this in Marathi this for project if yall know then only answer

Answers

Answered by gauravbhai666633
4

Answer:

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिझॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.

इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’. फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल.

माळशेज घाटातल्या विश्रांती घराच्या (?)

मागे हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात.

पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागते.

Similar questions