India Languages, asked by charviii5068, 1 year ago

Marathi Essay Aamchi Bagh

Answers

Answered by pushpa291275
5

Answer:

Explanation:

Water is life

Answered by halamadrid
19

◆◆"आमची बाग"◆◆

आमच्या घरासमोर आमची बाग आहे.ही बाग माझे बाबा, आत्या,काका यांनी वाढवली आहे.त्यांनी या बागेत विविध झाडे लावली आहेत.आम्ही सर्वजण या बागेची खूप काळजी घेतो.

आमच्या घरातील सगळ्यांना बागकाम आवडते.दादा रोज झाडांना पाणी घालतो.काका जंतुनाशके फवारतात.बाबा बाग स्वच्छ ठेवतात.आम्ही कोणत्या न कोणत्या प्रकारे बागकामात मदत करतो.

आमच्या बागेत वेगवगळी झाडे आहेत.आंबा, फणस,नारळ यांची मोठमोठी झाडे आहेत.त्याचप्रकारे चिकू व केळीची झाडेसुद्धा आहेत.

बागेत विविध फुलांची झाडे आहेत.जेव्हा झाडांना फूले येतात,तेव्हा बागेचे सौंदर्य अजून वाढते.आम्ही सगळेजण बागेत गप्पा मारायला बसतो,खूप मजा करतो.

आम्ही बागेत दोन झोपाळे बांधलेले आहेत.बसण्यासाठी एका झाडाभोवती पार बांधलेला आहे.आम्ही तिथे गप्पा मारत बसतो.

आमच्या बागेत फिरताना मला खूप आनंद होतो.कधी कंटाळा आल्यावर,मी बागेत वेळ घालवायला जाते,तेव्हा माझे मन प्रसन्न होतो.

मला आमची बाग खूप आवडते.

Similar questions