India Languages, asked by mgranandhi2115, 1 year ago

Marathi Essay Atmakatha

Answers

Answered by sweety759
0

फुलांनी फुलावे, निर्भयी हसावे

अर्थ द्यावा जगण्याला,

पाषणाही रंग द्यावे, देव भेटीला पावला"

ह्म्म, आता तरी ओळखलत का मला? सगळ्यांच्या गळ्यातला ताईत आणि व्हॅलेंटाईन ची शान...! हा दिवस माझ्याशिवाय साजराच होऊ शकत नाही. असा मी फुलांचा राजा "गुलाब"

निरनिराळ्या रंगांचा नजराणा घेऊन तुमच्या समोर येतो, तुमच्याही नकळत आणि एक कळी खुलते तुमच्या गालावर. दिवसातून एक गुलाब पहा आणि आनंदी रहा हाच माझा मंत्र

Answered by halamadrid
0

आत्मकथेचे उदाहरण खाली दिले गेले आहे:

◆◆छत्रीची आत्मकथा:◆◆

"बाळा कसा आहेस?,मी छत्री बोलतो आहे.आठवते का?तू आईबाबांबरोबर बाजारात गेला होतास.तूच मला पसंत केले होते.आज तुझ्याशी बोलावेसे वाटले.तुला माझ्या कहाणीबद्दल मी सांगणार आहे.

"माझा जन्म एका कारखान्यात झाला होता.तेथे कारीगर खूप मेहनत करतात.ते एका लांब दांड्याच्या टोकाला तारा गुंफतात.त्या तारांवर कापड शिवतात.हे कापड सुती असते. कधी नायलॉनचे किंवा रेशमाचेही असते.

या कापडाचा रंग म्हणजेच माझा रंग.पूर्वी मला एकच रंग होता.फक्त काळा.आता मी विविध रंगांमध्ये येतो.माझ्या अंगावर रंगीबेरंगी नक्षीही आहे.

'मी तुझी,तुझ्या कुटुंबाची खूप मदत केली आहे.मी उन्हापासून तुमचे रक्षण केले.पावसाळ्यात भिजण्यापासून वाचवले."

"तू आधी तर मला खूप जपून वापरले.मला नीट व्यवस्थित ठेवत असत.मला साफ ठेवत असत."

"पण कधी कधी तू माझे खूप हाल करतोस. कुठेही टाकतोस,स्वछ ठेवत नाहीस."

"मला हे अजिबात आवडत नाही.यापुढे तरी तू मला जपून वापरत जा"

चल आता निरोप घ्यायची वेळ आली.

Similar questions