Marathi Essay Competition
Answers
Answer:
आम्ही मागच्या काही दिवसांपासून मराठी निबंध माला चालू केली आहे, आम्ही अगोदरच इंग्लिश आणि हिंदी निबंध, भाषण, पॅराग्राफ लिहतो आणि आम्हाला इंग्लिश आणि हिंदी निबंध, भाषण विषयांवर उत्तम प्रतिक्रिया सुद्धा मिळतात. मराठी माझी मातृभाषा आहे, तस माझे व्याकरण थोडं कच्चे आहे, आणि ऑनलाईन मराठी टायपिंग मध्ये सुद्धा थोड्या चुका होतात, पण मी अशी आशा करतो की तेवढ तुम्ही समजून घ्याल. या मराठी निबंध संग्रहामध्ये आपण खूप सारे विषय पाहणार आहोत. यात नेहमी विचारले जाणारे विषय जसे, माझी आई, माझी शाळा, माझा आवडता खेळ, छंद, जागा, उन्हाळ्याची सुट्टी, पावसाळा आदी. या सोबत आपण ताज्या घडामोडी, टेक्नॉलॉजि. रिसर्च, व्यक्ती, इव्हेंट्स, सण, सुट्ट्या या विषयांवर ही बोलणार आहोत. तुम्ही ही आम्हाला नवं-नवीन निबंध, भाषण विषय सुचवू शकता, जेणे करून हा निबंध संग्रह आपणास परिपूर्ण बनवता येईल. मराठी निबंधाचे विषय वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ते वेग-वेगळ्या प्रकारे लिहता येतात. इथे दिलेल्या लेखामध्ये आम्ही निबंधाचे प्रकार यावर माहिती दिली आहे. माझी विनंती आहे की तो लेख तुम्ही वाचावा, या माहितीमुळे तुमचे निबंध लेखन सुधारू शकते. परीक्षेत निबंध लेखन तुमच्या भाषेची परीक्षा घेण्यासाठी असते. तुमचे भाषेचे ज्ञान, तिचा अभ्यास, आजूबाजूला होणाऱ्या घटनांची माहिती, त्याच्यावर तुमचे आकलन आणि मुख्यतः हे विचार, आकलन तुम्ही कसे मांडता, हे निबंध लेखनातून जाणले जाते.