India Languages, asked by piku618, 1 year ago

Marathi Essay Dushkal

Answers

Answered by Human100
0

Answer:

धरणांचे मोठे प्रकल्प बनवून त्यावर अधारीत सिंचन करून पाण्याचा प्रश्न सोडवला जातो. परंतु या प्रकल्पांना अनेक मर्यादा असतात. तसेच विस्थापन नियोजन करणे अवघड असते. म्हणून आधुनिक काळात विकेंद्रित व क्षेत्रीय जलसंधारण राबवले जाते. हा तुलेनेने कमी खर्चाचा व सोपे तंत्रज्ञान असलेला उपाय आहे. पावसाचे पाणी जास्तीतजास्त गावाच्या शिवारात अडवून विकेंद्रित स्वरूपाचे पाणीसाठे निर्माण करणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे असे उपाय यामध्ये आहेत. नद्यानाल्यांच्या खोलीकरण, रुंदीकरणातून जलसंधारण साधले जाते. शिरपुर येथे अशी योजना प्रथम राबवली गेली होती ती आता शिरपुर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्यात पन्नास टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचे विकेंद्रित साठे तयार करावे लागतील. जलसंधारण व मृदसंधारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खरा विकास होवू शकतो. विकेंद्रित जलसाठे तयार करून पाण्याचा योग्य वापर करणे आवश्‍यक आहे. पाण्याचेच विकेंद्रित गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र राज्यात जी लहान-मोठी तलावे तुटलेली व गाळाने भरलेली आहेत त्यांची दुरूस्ती व गाळ काढने आवश्यक आहे.

शिरपुर पॅटर्न हा प्रयोग त्या त्या भागातील भूगर्भाची रचना पाहून राबविला पाहिजे.

Answered by AadilAhluwalia
0

दुष्काळ

दुष्काळ एक अशी परिस्थिती आहे ज्यात खूप वेळासाठी, अगदी महिन्यांसाठी, पाण्याची खूप जास्त टंचाई निर्माण होते. दुष्काळाचा परिस्थिती पाण्यासाठी लोकांचे खूप हाल होतात. ह्या परिस्थितीच्या मागे अनेक करणे आहेत. जलचक्रात बदलामुळे दुष्काळ पडू शकतो. आजकाल वातावरणात अनेक बदल होत आहेत, त्या मुळे सुद्धा दुष्काळ पडतो. ज्वालामुखी फुटल्यामुळेही दुष्काळ पडू शकतो.

दुष्काळाचे मुख्य कारण सांगायचे म्हणजे झाडांची कमी झालेली संख्या. वृक्षतोड हे दुष्काळाला कारणीभूत आहे. झाडं नसल्यामुळे सपाट भागात पाऊस पडत नाही, आणि पाऊस न पडल्यामुळे लोकांना दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. वानवा पेटल्यामुळेसुद्धा झाडे कमी झाली आहे.

जल हे जीवन आहे. पाणी आपण रोज वापरतो. पाणी माणसाची मूलभूत गरज आहे. दुष्काळाचा फटका सामान्य माणसाला तर बसतोच पण सर्वात मोठा तोटा होतो तो म्हणजे शेतकऱ्याचा. पाणी नसल्यामुळे व दुष्काळ पडल्यामुळे पीक घेतले जात नाही. पीक नसल्यामुळे घरात पैसे येत नाही. काही कर्जबाजारी शेतकरी तर दुष्काळानंतर आत्महत्या करतात.

पाऊस दर वर्षी पडतो. किती पडतो ते सांगण्यात येऊ शकत नसलं तरी पडलेला पाऊस कसा साठवू शकतो ह्याचे उपाय करायला हवेत. दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी पाण्याचे नियोजन करणे महत्वाचे आहे.

झाडे लावणे, त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारण केलं जात. धरणाची प्रकल्प उभारली जातात. धरणातील पाणी पाटाच्या मार्फत शेतात सोडले जाते. याने पाणी पुरवठा नियमित होतो आणि पाण्याचे योग्य विभाजन व नियोजन होते.

सरकारने सुद्धा विकेंद्रित जलसंधारण योजना राबविली आहे जेणेकरून जमिनीला योग्य प्रमाणात सिंचन मिळावं.

अमीर खानचे पाणी फाउंडेशन दुष्काळ ग्रस्त गावांना मदत प्रदान करतं तसेच अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचे नाम फाउंडेशन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करतं.

Similar questions