Marathi Essay Rashtriya Ekatmata
Answers
Answer:
here is your answer......
राष्ट्रीय एकात्मता
एक काठी मोडणे सोपे असते पण काठ्यांचा गठ्ठा मोडणे खूप कठीण असते हे आपण लहानपणी पासून ऐकत आलो आहोत. एकता हा राष्ट्राचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. लोकांची एकता राष्ट्राला शक्तिशाली बनवते.
आपल्या भारत देशाचे वर्णन " विविधतेत एकता" असे केले जाते. आपल्या देशात अनेक जाती धर्मांचे लोक एकत्र नांदतात. वेष- भाषा जरी वेगळी असली तरी लोकांची मने एक आहेत. सर्व आपल्याला भारतीय म्हणून जाणतात.
राष्ट्रीय एकात्मता असली तर कोणीही राष्ट्रांकडे वाईट नजरेने पाहू शकत नाही. देशासाठी प्राणाची आहुती देणारे सैनिक आणि नागरिक जर एकत्र असतील तर त्या सारखा शक्तिशाली देश दुसरा नाही. आनंदात नसला तरी दुःखात एक असणं गरजेचं असत. विकट परीस्थिती समोर आली की एकत्र असलेला राज्य त्या परिस्थिती चा सामना खंबीरपणे करू शकतो.
आपापसात मतभेद असतील, भांडण तंटे असतील, तर एकात्मता नाहीशी होते आणि त्याचा देशाला फार मोठा तोटा होऊ शकतो. ब्रिटिश सरकारने सुद्धा हिंदू मुस्लिम मध्ये फूट पडून त्यांची एकता तोडली. त्या मुळे ते आपल्यावर १५० वर्ष राज्य करू शकले. जर एकता असती ,तर त्यांना आपल्यावर राज्य करणं कठीण झालं असतं.
राष्ट्राचे एकत्र असणे आवश्यक आहे. कितीही वाद झाले तरी राष्ट्र प्रेम जो पर्यंत नागरिकांचा मनात आहे, तो पर्यंत राष्ट्रीय एकात्मता आहे.