Marathi Essay Dahi Handi
Answers
Answer:
गोकुळ अष्टमी म्हणजे कृष्ण जन्माचा दिवस,जन्माष्टमी.याच दिवशी म्हणजेच श्रावण महिन्यात वद्य अष्टमी, या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणूनच या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव सर्व भारतात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. विशेषतः वृंदावन,मथुरा, गोकुळ, द्वारका, पुरी या ठिकाणी हा सण फार भव्य दिव्य प्रमाणावर होतो. हिंदू धर्मामध्ये गोकुळाष्टमीला एक अनन्यसाधारण महत्व आहे
गोकुळाष्टमी दिवशी महाराष्ट्रात राज्यात विशेषतः मुंबईत, उंच मातीच्या मडक्यामध्ये दही व दुध भरून उंच दोरीने बांधले जाते. तिथपर्यंत मानवी मनोरा तयार करून मडक्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्धा केल्या जातात.जो मडक्यापर्यंत पोहोचला तो त्या मडक्याला नारळाने फोडून दहीहंडी स्पर्धा जिंकतो.‘गोविंदा’ हा एकदम साहसी खेळ होतो.
या उत्सवाच्या दिवशी काल्याचा प्रसाद तयार केला जातो. सर्वांना नैवैद्य म्हणून दही, पोहे, काकडी यांचा एकत्र काला दिला जातो. लोणी आणि साखरेचा प्रसाद एकत्र करून कृष्णाला दिला जातो.
Explanation:
भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री १२.४०ला रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत झाला, त्या दिवसाला गोकुळअष्टमी किंवा जन्माष्टमी म्हणून संबोधले जाते. कृष्णाष्टमीनंतर दुसरे दिवशी साजरा केला जातो गोपाळकाला उत्सव.
गोपाळकाला यालाच दहीकाला असे देखील म्हटले जाते. गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. कृष्ण जयंतीचा उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. दहीहंडी आणि कृष्णजन्माष्टमी यांच्या निमित्ताने पोहे, दही, दूध, ताक, लोणी, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबाचे वा आंब्याचे लोणचे, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. हा कृष्णास फार प्रिय होता, असे सांगितले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत असे मानले जाते. श्रीकृष्ण त्याच्या बालपणी आपल्या मित्रांसह गोकुळातील घरांमध्ये जाऊन टांगलेल्या शिंकाळ्याच्या मडक्यातील दही खात असे. त्यासाठी मुले मानवी मनोरा करून मडके फोडीत असत. ही परंपरा आजही भारतात दहीहंडीच्या रूपाने साजरी केली जाते.