India Languages, asked by satyaram3901, 10 months ago

Marathi Essay On Plastic Ek Samasya

Answers

Answered by jyotsna19
6

Answer:

प्लास्टिक बॅग्जपासून होणारं पर्यावरणाचं नुकसान आज सर्वानाच माहीत आहे. जगात आज निव्वळ प्लास्टिकच्या वापरापासून होत नसेल इतकं नुकसान केवळ प्लास्टिक बॅग (थैली किंवा पातळ पिशवी)च्या वापरामुळे होत आहे. प्लास्टिकची पिशवी निर्माण झाल्यानंतर ती नष्ट होण्यासाठी सुमारे हजार एक वर्ष लागतात. वाचूयात या गंभीर समस्येविषयी..

RUBBISH-ON-BEACHES-DATA

नुकतंच काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीसह तीन शहरांत काही व्हेडिंग मशिन्स बसवण्यात आल्या. या अजब मशिन्समध्ये प्लास्टिकचे कॅन व पॅक टाकल्यावर त्यातून बसचं तिकीट मिळायची सोय केली गेली आहे. ही कल्पना तिथल्या नागरिकांना खूप आवडलीय व त्यांनी प्रचंड प्रतिसाद या नव्या कल्पनेसाठी दिलाय. इतका की पहिल्या तीनच दिवसांत या मशिन्समध्ये दहा हजाराहून अधिक कॅन्स, पॅक साठवले गेले. हे कॅन व पॅक आता पुनर्निर्माणासाठी पाठवण्यात येतील. मुद्दा हा आहे की जगभरात प्लास्टिकची वाढती समस्या अधिकाधिक गंभीर बनत चाललीय. या समस्येचाच एक सर्वात मोठा भाग आहे प्लास्टिक पिशव्या. आज या पिशव्यांचा वापर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिलाय. पण पृथ्वीवरील हे प्रदूषण सहजासहजी नाहीसं होण्यासारखं नाही.

जगातील सर्व प्रमुख समुद्र आज निरनिराळ्या आकाराच्या प्लास्टिक पिशव्यांनी कोंदलेले आहेत. तिथं प्लास्टिकच्या पिशव्या नुसत्या तरंगतायत असं नाही तर या पिशव्यांच्या कच-याची महाकाय बेटं तिथं निर्माण झालेली आहेत. दरवर्षी सुमारे दोन कोटी देवमासे, डॉल्फिन्स, सील्स, सी लायन, इतर जलचर तसंच इतर पशू-पक्षी यांचा या प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे मृत्यू होतो आहे. हे जमिनीवरील व समुद्रातील प्राणी खाद्य म्हणून प्लास्टिकच्या पिशव्यांकडे आकर्षति होतात. त्यांच्या पोटात पिशवी गेल्यावर त्यांना जंतूसंसर्ग होऊन त्यांची चयापचय प्रक्रिया बिघडून त्याची परिणीती अखेर मृत्यूत होते. आज जगातील समुद्रांमधील ९० टक्के कचरा हा प्लास्टिक पिशव्या व इतर प्लास्टिकचा आहे. तीच गत जमिनीवरील कच-याचीही आहे. तुम्ही आजूबाजूच्या कच-याच्या ढिगाकडे नजर टाकली तर तुम्हाला प्लास्टिकची पिशवी चघळणारी एखादी गाय वा कुत्रा नक्कीच दिसेल. इतकंच नाही तर देवस्थानानजीक नेहमीच माकडं अशा पिशव्या पळवून नेताना दिसतात. हे असेच दुर्दैवी प्राणी असतात. मानवप्राण्याला प्लास्टिक घातक आहे हे कळत असल्यामुळे तो ते खात नाही; मात्र आपण याचा वापर अद्याप थांबवलेला नाही.

एकदा निर्माण झालेलं प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही. या उलट त्याचे तुकडे पडून ते इतरत्र जमिनीत, समुद्रात, नदी-नाल्यात मिसळत जाऊन ते प्राण्यांच्या तोंडी येतात. काही वेळेस असे प्राणी मनुष्याच्या पोटात गेल्यावर याच प्लास्टिकचा अंश आपल्याही पोटात जात असतो. १९५०च्या सुमारास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ लागला व साठच्या दशकानंतर तो वाढतच गेला. तेव्हापासून निर्माण झालेला एकही प्लास्टिकचा तुकडा अद्याप नष्ट झालेला नाही. तो आजही तसाच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तसाच पृथ्वीवर टिकून आहे. काही प्लास्टिक पिशव्या या इतक्या पातळ असतात की त्यांचा फक्त एकदाच कसाबसा वापर होऊ शकतो. या पिशव्या २० मायक्रॉनपेक्षा कमी असतात. या पिशव्यांचा कचरा ही आज जगाची सार्वत्रिक समस्या बनलेली आहे. हा कचरा गाळ बनून आपल्या, सांडपाणी वाहून नेणा-या पाईप्समध्ये, गटारांमध्ये, जमिनीत, नाल्यांमध्ये, नद्या व समुद्रात अडकून राहतो. असा कचरा साठल्यामुळे कित्येक कसदार जमिनी नापीक बनल्याची उदाहरणं आहेत.

शिवाय हा कचरा हटवणं ही फार मोठी कठीण गोष्ट असते. खेरीज प्लास्टिक पिशव्यांचा हा कचरा इकडून नेऊन दुसरीकडे टाकला तरी तो नष्ट करणं शक्य नाही. त्यामुळे जगात या प्लास्टिक पिशव्यांच्या कच-याचे ढिग वाढतच आहेत. आज आपण खरेदी, वेष्टन, कचरा फेकणे अशा अनेक कारणांकरता प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असतो. याच प्लास्टिक पिशवीचं विघटन होण्यासाठी सुमारे एक हजार र्वष लागतात. खरं तर प्लास्टिक पिशव्यांच्या जन्मापूर्वी मनुष्य इतर प्रकारच्या प्राणीजन्य पदार्थाचा आवरण किंवा थैली म्हणून उपयोग करत होता. परंतु प्राणीहत्या व निसर्गाचा नाश थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाला तो आजतागायत. तो इतका वाढलाय की जणू त्यानेच आपल्याला विळखा घातलेला आहे.

Explanation:

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्याऐवजी आपण काय करू शकतो?

पुनर्वापर, कमी वापर व पुनर्निमाण : प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणं लोकांनी थांबवावं यासाठी आज जगात सर्वत्र समाजप्रबोधन केलं जातं. त्याला यशही मिळतं आहे. लोकांनी प्लास्टिक पिशव्यांचा कमीतकमी वापर करावा यासाठी त्यांना समजावलं जातं. त्यानुसार आज अनेकांनी या पिशव्या वापरणं कमी किंवा बंद केलेलं आहे. या पिशव्यांचा पुन्हा पुन्हा वापर कसा करता येईल व तितकाच पर्यावरणाला धोका पोहोचवण्याची वेळ टाळता कशी येईल हे देखील पाहिलं जातं. तसंच पिशव्या गोळा करून त्यांचं पुनíनमाण करून त्या पुन्हा वापरात आणल्या जातात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगात १ बिलियन टन इतकं प्लास्टिक निर्माण झालं व आज एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच हे उत्पादन पूर्वीपेक्षा दुप्पट झाल्याची नोंद ‘सायंटिफिक अमेरिकन’ या संशोधन मासिकानं केली आहे.

Answered by Hansika4871
18

*प्लास्टिक एक समस्या*

एकविसाव्या शतकात वाढत्या तंत्रज्ञान व लोकसंख्येमुळे विविध चांगल्या आणि वाईट गोष्टींना सामोरे जावे लागत आहे.

चांगल्या म्हणाल तर मुलांना नोकऱ्या, नवीन नवीन शोध इत्यादी आणि वाईट गोष्टी म्हणजे पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम.

आजच्या काळात प्लास्टिक हे आपल्या पर्यावरणासाठी खूप हानिकारक गोष्ट झाली आहे. प्लास्टिक हे बायो देग्रडबल गोष्ट नसल्या मूळे त्याचे मातीत विघटन होत नाही आणि बरेच वर्ष ते तसच पडून राहते. प्लास्टिक नष्ट व्हायला शेकडो वर्षे लागतात. प्लास्टिक हे खूप टिकाऊ मटेरियल असते त्यामुळे त्याचे विघटन होणे खूप कठीण आहे. हे प्लास्टिक समुद्रामध्ये माशे आपल्या पोटात गिळतात आणि त्यांचा मृत्यू होतो, जमिनीवर देखील प्राणी पक्ष्यांवर प्लास्टिक चे तोटे दिसून येतात.

हे प्लास्टिक आपल्याला भारतातून कायमचे नष्ट करायचे असेल तर हळू हळू आपल्याला त्याचा वापर आणि प्रचार कमी करायला लागणार ज्याने करून भारत देस प्लॅस्टिक मुक्त होईल. प्लास्टिकच्या ऐवजी आता कमी ग्रेडच्या प्लास्टिक याचा शोध लावण्यात येत आहे, त्याचे विघटन लगेच होते. प्लास्टिक च्या बॅग आपण न वापरता कापडी पिशव्या वापरल्या पाहिजेत आणि बॉटल्स (प्लॅस्टिक) ह्यांचा वापर कायमचा थांबवला पाहिजे. प्लास्टिक रिसायकल करणे खूप गरजेचे आहे. रिसायकल करूनच आपण जुने प्लास्टिक पुन्हा पुन्हा वापरू व नवीन गोष्टी बनवण्यासाठी आपल्याला नवीन प्लास्टिकची गरज लागणार नाही.

ह्या सगळ्या गोष्टींचे पालन केले तर प्लॅस्टिक चे साम्राज्य भारत देशातून निघून जाईल आणि सगळीकडे हिरवळ पसरेल, प्रदूषण कमी होईल, समुद्र निळे दिसतील आणि जीवित हानी देखील होणार नाही.

Similar questions