India Languages, asked by Troll3574, 1 year ago

Marathi Essay Examples

Answers

Answered by crazygirl1920
0

Answer:

hyyyyyyyyyyyy...........

inbox me and follow me.........

please please.........

Attachments:
Answered by Hansika4871
0

" Marathi Essay Example "

" आमची सहल "

आमच्या शाळेत दरवर्षी आम्हाला सहलीला घेऊन जातात. कधी इसेल वर्ल्ड तर कधी वॉटर किंग्डम, कधी नेहरू सेंटर तर कधी तारापोरवाला मत्सालय. सहल ही आमच्या मनात आनंदाचे फुगे फोडते व आम्ही खूप आतुर असतो. गेल्याच महिन्यात शाळेतून राणीच्या बागेत आमची सहल काढण्यात आली. पूर्वीची राणी बाग आणि आताची यामध्ये फरक दिसला.

निसर्गरम्य अशा राणी बागेत हत्तीने आमचे स्वागत केले. जिराफ, गेंडा, झेब्रा, हरीण, काळवीट, मोर, लांडोर ह्यांचा सह वाघ, सिंह, अस्वल, कोल्हा आराम करत होते. माकड उड्या मारत होती. रंगीत पक्षी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. दुपारच्या जेवणानंतर जलचर प्राणी पाहण्याचा आनंद घेतला, फिरता फिरता आमचा वेळ कसा निघून गेला हे आम्हाला समजलंच नाही. दुपारी वेळ झाली ती जेवणाची, खूप चालल्यामुळे आम्हाला जबरदस्त भुल लागली होती. आम्ही रांगा लावून जेवणाची वाट पाहू लागलो. दुपारच्या जेवणात पाव भाजी होती, त्याची चव खूप अप्रतिम होती. सोबतच आम्हाला फ्रूती सुद्धा दिली. पोटभर जेवून आम्ही परत फिरायला गेलो. संध्याकाळ पर्यंत आम्ही बागेत पकदा पकडी, खो खो असे अनेक खेळ खेळलो, खूप मजा आली, दिवस संपूच नये असं वाटत होतं पण संध्याकाळी घरी परतायची वेळ झाली कारण काळोख होऊ लागला.

ते सगळं चित्र डोळ्यात साठवून संध्याकाळी आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो.

Similar questions