Marathi Essay Ganpati
Answers
Answer:
Explanation:
गणेशोत्सव गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. घराघरांत आणि सार्वजिनिक मंडळांत श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा वआरती केली जाते. कोंकणामध्ये, आरतीच्या नंतर देवें म्हणतात. अन्यत्र आरतीनंतर गणपतीला नैवेद्य दाखवून प्रसाद वाटतात. अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तींचे तलाव, नद्या, समुद्र यात विसर्जन होते.गणेश चतुर्थीला सुरू झालेला गणेशोत्सव हा दहा दिवसांचा सोहळा असतो. हा गणेश उत्सव भारतात, महाराष्ट्र या शिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू, ओरिसा आणि छत्तीसगडमध्ये तसेच, भारताबाहेरही ब्रिटन, अमेरिका, फिजी, सिंगापूर, नेपाळ, मलेशिया, कंबोडिया, कॅनडा, ब्रह्मदेश, आणि त्रिनिदाद व टोब्यागो या देशांमध्ये साजरा केला जातो. मुंबई आणि पुण्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात होयो. पुण्यात पाच मानाचे गणपती आहेत. कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग आणि केसरी वाडा. या व्यतिरिक्त दगडूशेठ हलवाई, मंडई, बाबू गेनू आणि जिलब्या मारुती ही काही इतर मोठी मंडळे आहेत. पुण्यात हिरा बाग मंडळ हे भव्य देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबई मध्ये लालबागचा राजा हा सर्व गणपतींत मोठा मानलेला गणपती आहे.
" Ganapati "
" Ganesh Utsav "
भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला महाराष्ट्रात तसेच भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये गणेशोत्सव आनंदाने साजरा करतात. हा सण अकरा दिवसांचा असून काही ठिकाणी २१ दिवसांचा हे करतात. या सणाचं महत्त्व ही दीड दिवसाच्या गणपतीपासून ते पाच दिवसाचा गणपती, सहा दिवसाचा गौरी गणपती ,सात दिवसाचा गणपती आणि नंतर अकरा दिवसांचा गणपती अशा पद्धतीने गणपतीचे विसर्जन केलं जातं.
हा उत्सव महाराष्ट्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापन केला , त्या मागचा उद्देश एवढाच होता की समाज जागृती व्हावी ,लोक एकमेकांच्या घरी जाऊन आनंद सोहळा साजरा करू द्यावेत, आणि जनजागरण होण्यासाठी त्यावेळी लोकमान्य टिळकांनी हा सण स्थापन केला आणि पुढे महाराष्ट्रात तो वाढीस लागला.
सांस्कृतिक असलेल्या या सणाचे महत्त्व असं की या दिवसात एक मंगलमय वातावरण असतं, आनंदाचं वातावरण असतं .बाप्पाच्या आशीर्वादासाठी जे भक्त जण असतात भक्तगण असतात ते या दिवसात देवाची आरती करतात देवाला मनोभावे आपल्या मनातले विचार मांडून त्याच्या पायी नतमस्तक होतात आणि बाप्पा साठी गोडधोड पदार्थ बनवतात.एकमेकांकडे गणपतीला जाण्याने एकमेकांकडे चा आनंद द्विगुणित होतो यामध्ये आचार-विचार यांचा प्रधान होतं.
असा हा सण खूप रम्य असतो.