India Languages, asked by venkatpranesh5511, 8 months ago

Marathi Essay On Holi Festival

Answers

Answered by lokeshbisht2017
7

Explanation:

होळी हा रंगांचा सण आहे . २.होळी चा सण पूर्ण भारतात साजरा केला जातो . ३.होळी हा २ दिवसांचा सण आहे. ४. पहिल्या दिवशी आपण होलिका जाळतो . ५.होळी च्या पहिल्या दिवसाला छोटी होळी म्हणतात . ६.दुसऱ्या दिवशी सगळे लोक पाणी आणि रंगाने खेळतात . ७.होळी चा दुसऱ्या दिवसाला रंगवली होळी ,धुलेती, किंवा रंगपंचमी म्हणतात . ८.होळी हा सण चांगले पणाचा वाईटावर विजय प्रतीत करतो ९.ह्या दिवशी विष्णू देवांनी आपल्या भक्त प्रह्लाद ला होलिका पासून वाचवले होते. ह्या कारण मुळे आपण होळीच्या दिवशी होलिका जाळतो.

Continue reading at 10 Lines, Sentences, Short Essay on Holi in Marathi | होळी विषयी मराठीमध्ये १० ओळी निबंध | TeenAtHeart

Answered by halamadrid
13

◆◆"होळी"◆◆

होळी हा भारतभर उत्साहाने साजरा केला जाणारा रंगांचा उत्सव आहे.फाल्गुन महिन्यात येणारा या सणाला शिमगा, रंगपंचमी असे ही म्हटले जाते.

होळी साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. ती कथा अशी आहे,हिरण्यकशपू नावाचा एक राजा होता.त्याचा पुत्र प्रल्हाद हा विष्णू देवाचा मोठा भक्त होता.हिरण्यकशपूने त्याला अनेक वेळा देवाची भक्ति करण्यापासून थांबवले,पण तो थांबला नाही.

त्याची बहिण होलिका हिला आगीपासून सुरक्षित राहण्याचा वरदान होता.हिरण्यकशपूने तिच्यासोबत प्रल्हादला मारण्याचा कट रचला.ती एकदा प्रल्हादला तिच्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली.

होलीकेने तिला मिळालेल्या वरदानाचा गैरवापर केल्यामुळे ती अग्नीत दहन झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला.असे मानले जाते,कि त्या दिवसापासून होळी साजरा केली जाते.

होळीच्या वेळी घरी पुरणपोळी, करंजी व इतर गोड पदार्थ बनवले जातात.होळी हा सण दोन दिवसांचा असतो.पहिल्या दिवशी होळी दहन केले जाते.तेव्हा, लाकडाच्या ढीगापासून होलिका तयार केली जाते,तिचे पूजन झाल्यावर तिला पेटवले जाते.

दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाला लोक एकमेकांना रंग लावतात.सगळेजण या दिवशी आपल्यामधील भांडणे विसरून,एकमेकांना रंग लावतात.नाचत,गाजत आनंदाने हा सण साजरा केला जातो.

Similar questions