Hindi, asked by shahanajMRITIC, 1 year ago

Marathi essay on duck

Answers

Answered by mivaidehi
24

बदक हा एक उभयचर पक्ष्यांचा वर्ग आहे. हे पक्षी पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी संचार करू शकतात. हंसापेक्षा लहान आणि शरीराने स्थूल असते. मान आणि पाय आखूड असतात. पाय शरीराच्या बऱ्याच मागच्या बाजूला असतात. बदकाच्या पिसांवर तेलाचा थर असतो ज्यामुळे पिसे कधीच ओली होत नाहीत. त्यांचा रंग पिवळा असून त्यांच्यावर पुढे तीन व मागे एक बोट असते; पुढची बोटे पातळ कातडीने जोडलेली असतात.  

कोंबड्याप्रमाणे अंडी व मांस यांच्या उत्पादनासाठी बदके जगामध्ये सर्वत्र पाळली जातात. तथापि व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर ती फारच कमी प्रमाणात पाळण्यात येतात. भारतामध्ये बदके मुख्यत्वे अंड्यांसाठी पाळण्यात येतात.  

बदक सर्वभक्षक आहे. बदक गवत, पाने, फळे आणि बारीक मासे सुद्धा खातात. ज्यामुळे बदकांना खाद्य नेहमी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते.  बदक दोन ते बारा वर्षापर्यंत जगू शकतात. देशी कोंबडीच्या मानाने गावठी बदकांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते आणि बदकांची अंडी देण्याची क्षमताही जास्त असते. बदकाच्या पालनात कोंबडी पालनापेक्षा काही जास्त फायदे आहेत.


Similar questions