marathi essay on 'Majha chand'
Answers
>> दिगंबर जोशी
वाचनाची आवड लहानपणीच मला लागली - ४थीत असताना. वडिलांनी वाचनाच्या हौसेपोटी जमवलेली चांगली पुस्तके होती जेमतेम एक ट्रंकभर. पुढे हायस्कूलमध्ये गेल्यावर ती वाचता वाचता मला पुस्तकं विकत घेऊन वाचावीशी वाटू लागलं. पण खरा ग्रंथसंग्रह वाढू लागला तो कॉलेजात शिकायला लागल्यापासून. मी आर्ट्सचा विद्याथीर् - मराठी व संस्कृत हे आवडते विषय. इंग्रजी एक उत्तम ज्ञानसंवर्धक भाषा म्हणून आवडू लागली. त्या काळात मी मला वडील देत असलेल्या साप्ताहिक पॉकेटमनीचा उपयोग जुनी पुस्तकं विकत घेण्यासाठी करू लागलो. त्या काळात गिरगाव नाक्याच्या फूटपाथवर जुनी पुस्तकं विकणाऱ्यांकडून मला खूप पुस्तकं मिळाली. एकूणच ललित वाङ्मयापेक्षा वैचारिक साहित्यकृतींकडे ओढा जास्त म्हणून तशी खरेदी होत गेली. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतर मला पुस्तकं विकत घेऊन संग्रह करण्यात जास्तच मजा वाटू लाग
■■"माझा छंद"■■
प्रत्येकाला कोणता न कोणता छंद असतो. कोणाला चित्रकलेचा, तर कोणाला नृत्य करण्याचा तर कोणाला गीत गाण्याचा छंद असतो.
माझ्या मते, प्रत्येकानेच एखादे छंद जोपासले पाहिजे, ज्यामुळे आपण आपल्या आवडत्या छंदामध्ये व्यस्त राहतो व आपल्याला मनोरंजनसुद्धा मिळते.
माझा आवडता छंद आहे नृत्य.मला नृत्य करायला फार आवडते.मला नृत्यची आवड माझ्या आईमुळे लागली. मी चौथीत असताना माझ्या आईने मला डान्स क्लासला पाठवायची सुरुवात केली होती.तेव्हापासून मला नृत्य फार आवडायला लागले.
नृत्य करताना मी माझ्या सगळ्या चिंता,दुख विसरून एका वेगळ्याच दुनियेत रमून जाते.मला नृत्य करताना मला खूप आनंद मिळतो.हा छंद जोपासायला पैसा लागत नाही,फक्त एखाद्या गण्याची गरज असते.
गाणी लावा आणि बिंधास्त,बेफिकीर होऊन नाचा, यामुळे नक्कीच आपले ताणतणाव कमी होते.तसेच नृत्य करून आपल्या शरीराचा व्यायाम ही होतो.