India Languages, asked by Shettayy, 1 year ago

marathi essay on mala dev bhetla tar

Answers

Answered by tejasmba
544

मला देव भेटला तर

आज पर्यंत कुणीच देवाला नाही बघितलय. समजा जर मला देव भेटला तर!......किती छान कल्पना आहे न. जर मला देव भेटला तर मी खूप-खूप आनंदी होणार. सर्वप्रथम मी त्याचं भव्य स्वागत करणार. त्याला स्पर्श करणार. व खात्री करणार की तो खरच आपल्या सारखाच आहे की नाही। आपल्या सारखेच त्याला सुद्धा दोन डोळे, दोन हाथ, कान व पाय आहेत की नाही. मी देवा सोबत खूप गप्पा मारणार. त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालणारं.

देवाला मी धन्यवाद करणार की त्याने मला सुंदर सृष्टीचा आनंद घेण्याकरिता मनुष्य जन्म दिलाय. मा‍झ्या मनात कित्येक प्रश्न आहेत ते मी देवाला विचारणार? त्याने कसे सृष्टी निर्मिती केली? इतके सुंदर सूर्य, चंद्र, तारे, नदी, पहाड, झरे, डोंगर, दरी, पक्षी, प्राणी, फुले, झाडे बनवली.

आणि शेवटी मी त्याला विनंती करणार की संपूर्ण जगातून गरीबी, भेदभाव नष्ट कर व सर्वांना एकत्र राहण्यास शिकव. मी त्याला विनंती करणार की मा‍झ्या सर्व कुटुंबाला व मित्रांना सुखी ठेव.

जेव्हा तो निरोप घेणार तेव्हा तर मला रडायलाच येईल. परंतु मला माहिती आहे, जर मी देवाला स्वत:कडेच राहू दिले तर मग या सृष्टीचे काय होणार? म्हणूनच मी देवाला निरोप देणार पण एका शर्ती वर की तो असेच मध मधून माझ्याकडे येत राहणार.
Answered by chahatmaharaj
3

Explanation:

अच्छा,तो प्रसन्न झालाय का? मग ठीक आहे. एक प्रयत्न करेन.

पहिली: मला लवकर लवकर पुस्तके वाचता यावी ( at faster rate) असं वरदान द्यावं, जेणेकरून मला जास्तीत जास्त पुस्तकं वाचता येतील.

दुसरी: मला माझ्या वडिलांची प्रत्येक, प्रत्येक इच्छा पूर्ण करायचीय, पण त्यासाठी त्यांना बोलतं केलं पाहिजे, तू करशील का?

आणि शेवटची,

मला तो नोबिता (Nobita) खूप आवडतो यार, भेटवशिल का एकदा?

Similar questions