India Languages, asked by yamunonu3958, 11 months ago

marathi essay on masi ajooba

Answers

Answered by sanikabanne
1

Answer:

माझे आजोबा माझे खूप लाड करतात मला रागवत नाहीत माझे आजोबा मला आवडतात

Answered by AadilAhluwalia
0

*माझे आजोबा*

माझे आजोबा लहानपणापासून माझे सर्वात चांगले मित्र आहेत. आम्ही त्यांना ' आबा ' म्हणतो. ते आमचा घरातील सर्वात मोठे सदस्य आहेत. हसरा चेहरा, डोळ्यावर चष्मा आणि हातात छडी ही त्यांची ओळख. त्यांना नवीन लोकांना भेटायला आणि त्यांच्याशी गप्पा मारायला फार आवडते.

आबा माझे खूप लाड करतात. ते माझा राग करत नाही आणि जर बाबा मला ओरडले तर ते बाबांना ओरडतात. आम्ही दोघे एकाच खोलीत राहतो. ते रोज सकाळी मला शाळेसाठी तयार करतात आणि मला शाळेत सोडायला येतात. संध्याकाळी मला शाळेतून घ्यायला सुद्धा येतात. घरी आल्यावर ते माझा अभ्यास घेतात. कधी कधी आम्ही बागेत सुद्धा जातो. रोज रात्री झोपताना ते मला रामायण आणि महाभारतातील गोष्टी सांगतात आणि त्यातील बोध घ्यायला सांगतात.

आबानीं माझे सर्व श्लोक पाठ करून घेतले आहेत. मी आणि आबा खूप मस्ती करती. कधी कधी बाबा रागावले तर आबा त्यांना रागावतात. माझे आबा खूप पुस्तके वाचतात आणि मला सुद्धा त्यांनी वाचनाची सवय लावली आहे. त्यांना लिखाणाची आवड आहे. जर काही लिहिले तर सगळ्यात आधी ते मला वाचायला देतात.

मला माझे आजोबा फार आवडतात. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो.

Similar questions