Marathi essay on maza avadta chand
Answers
Answer:मला अनेक छंद आहेत, पण त्यांपैकी पुस्तक वाचणं हा माझा आवडता छंद आहे. तो आवडता होण्याचं कारण म्हणजे मी अगदी दोन वर्षांची छोटी मुलगी होते, तेव्हा माझे आई-बाबा – विशेषत: आई – मला खूप पुस्तकं वाचून दाखवायचे. आम्ही सुरुवातीला चित्रांच्या गोष्टींची पुस्तकं वाचायचो. त्यानंतर पऱ्यांच्या गोष्टी वाचायला लागलो.
माझ्या मावशीने मला पुष्कळ मराठी पुस्तकं वाचण्यासाठी आणून दिली होती, पण त्या वेळी मी फक्त पाच वर्षांची असल्याने मला वाचता येत नव्हतं. त्यामुळे रोज रात्री आई पार थकून गाढ झोपी जाईपर्यंत मी तिला गोष्टी वाचून दाखवायला लावायचे.
वाचनामुळे एका खोलीत बसून तुम्हाला लाखो ठिकाणांची सफर घडते. वाचनामुळे तुम्हाला कुणा दुसऱ्याचं आयुष्य अनुभवता येतं. वाचनामुळे तुम्हाला वास्तवापासून पळही काढता येतो. माझ्यासाठी तर वाचन स्वर्गसुखच आहे! वाचनामुळे झालेल्या दोन गोष्टींसाठी मी स्वत:ला नक्कीच नशीबवान समजते. एक म्हणजे मला प्रवास करायला खूप आवडतो. एकाच पुस्तकातून मी हजारो ठिकाणचा प्रवास करू शकते. आणि दुसरी, जर मला वाचायची आवड नसती तर मी तुमच्यासाठी हा लेख लिहू शकले नसते.
Explanation: