India Languages, asked by Neerajn2111, 9 months ago

Marathi essay on my favourite festival

Answers

Answered by shinchan8796
2

Answer

नवरात्र, दसरा झाला की दिवाळीची चाहूल लागते. वातावरणातील उष्णता हळूहळू कमी होऊन थोडी थंडी पडू लागते. सगळ्यात मोठा सण दिवाळी. नवीन कपडे, अन्नपदार्थाची रेलचेल, भरपूर फटाके, दिव्यांची आरास इत्यादी अनेक गोष्टींमुळे दिवाळी हा मोठा सण असतोच, पण खूप मोठी आनंदाची पर्वणी असते. थंडी पडू लागते आणि पचनशक्ती वाढू लागते. भूक वाढू लागते. पोषण होण्याचा हा काळ असतो. पचविण्याची शक्ती चांगली असल्याने जड अन्नपदार्थ पण चांगले पचवले जातात. खूप सारे पदार्थ दिवाळीत बनविले जातात. करंजी, चकली, लाडू, शंकरपाळी, चिवडा आदी. प्रत्येक पदार्थ वेगळा चवीसाठी पण त्यातील घटक पदार्थासाठी पण. या फराळाद्वारे खूप प्रकारचे अन्नपदार्थ खाल्ले जातात. खाण्यात खूप वैविध्य येते आणि त्यायोगे भरपूर जीवनसत्त्वे शरीराला मिळतात. या पदार्थामध्ये प्रामुख्याने कबरेदके व चरबीयुक्त पदार्थ जास्त असतात. प्रथिने असलेले पदार्थ पण आहेत. उदाहरणार्थ चकली. बरेचसे पदार्थ तळून/साखरेच्या पाकात तयार केले जातात. तूप बऱ्याच प्रमाणात वापरले जाते. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार आपण हे पदार्थ बनवितो त्यात फार काही बदल झाले नाहीत. मिळणारी ऊर्जा भरपूर असते, पण एका गोष्टीत मोठा बदल झाला आहे, ती म्हणजे आपली जीवनशैली. पूर्वीच्या लोकांना भरपूर शारीरिक कष्ट होते आता बैठी जीवनशैली आहे. ऊर्जा खर्च होण्याचे प्रमाण कित्येक पटींनी कमी झाले आहे. म्हणजेच मिळणारी ऊर्जा तेवढीच/वाढत गेली पण खर्च होण्याचे प्रमाण घटले आणि त्यातूनच स्थौल्य, मधुमेह हे आजार उदयास आले. म्हणून दिवाळी जरूर साजरी करा; पण डोळसपणे. जसे आपण आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये काळाप्रमाणे बदल केले तसेच हे पदार्थ बनविण्याच्या पद्धतीमध्ये केले तर दिवाळी आरोग्यदायीसुद्धा होय.

Hope this will help you

Mark me as brainlist

Answered by sheetalgala38
0

Answer:

मला बरेच छंद आहेत, परंतु पुस्तक वाचणे त्यापैकी एक आहे. मला हे आवडण्यामागचे कारण असे आहे की जेव्हा मी दोन वर्षांची मुलगी होती तेव्हा माझे आई-वडील - विशेषत: माझी आई मला खूप पुस्तके वाचायची. आम्ही सुरुवातीच्या काळात चित्रांची पुस्तके वाचत असत. मग आम्ही परीकथा वाचण्यास सुरवात केली.

माझ्या काकूंनी माझ्याकडे बर्‍याच मराठी पुस्तके वाचण्यासाठी आणली होती, पण त्यावेळी मी फक्त पाच वर्षांचा होतो आणि मला वाचता येत नव्हते. म्हणून मी तिला दररोज रात्री तिला थकल्यासारखे आणि झोप येईपर्यंत वाचायला लावायचे.

वाचन आपल्याला एका खोलीमधून दुसर्‍या खोलीपर्यंत नेते. वाचन आपल्याला दुसर्‍याचे आयुष्य अनुभवण्याची अनुमती देते. वाचन आपल्याला वास्तविकतेपासून सुटण्यास देखील मदत करू शकते. माझ्यासाठी वाचन म्हणजे स्वर्गीय आनंद आहे! वाचनामुळे घडलेल्या एका गोष्टीसाठी मी निश्चितपणे स्वत: ला भाग्यवान समजतो. एक म्हणजे मला प्रवास करायला आवडते. मी एकाच पुस्तकात हजारो ठिकाणी प्रवास करू शकतो.

Explanation:

Similar questions