marathi essay on tootle la capa chi atmakatha
Answers
Answer:
Mujay nahi Pata https://media.giphy.com/media/z0owfnH2wjYI0/giphy.gif
■■ तुटलेल्या कपाची आत्मकथा■◆
नमस्कार, मी एक कप बोलत आहे. आता मी तुटलो आहे, म्हणून खूप वाईट दिसतो.पण आधी मी तसा नव्हतो.
माझ जन्म एका कारखान्यात झाला होता.तेव्हा मी चकचकीत सफेद रंगाचा होतो.माझ्यावर सुंदर डिज़ाइन होती.माझ्यासोबत माझे इतर मित्र सुद्धा होते.
नंतर आम्हाला सगळ्यांना एका दुकानात विकायला आणले गेले.हळूहळू माझ्या इतर मित्रांना कोणी न कोणी विकत घेतले आणि आम्ही वेगवेगळे होऊ लागलो.
एक दिवशी एका बाईने मला विकत घेतले.त्या दिवशी मी खूप खुश होतो.दुसऱ्या दिवशी माझ्या मालकीनीने मला वापरायची सुरुवात केली.माझा उपयोग ती चहा पिण्यासाठी करायची.
जेव्हा मालकीनीच्या घरी येणारे पाहुणे माझ्या सौंदर्याचे कौतुक करायचे तेव्हा मला फार आनंद व्हायचा.मी तिथे खूप आनंदात होतो.
पण एके दिवशी माझ्या मालकीनीच्या हातातून चूकून मी खाली पडलो व तुटलो. मी वापरण्यायोग्य नाही राहिल्यामुळे, मला तिने कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून दिले.तेव्हा, मला खूप दुख झाला, पण मी कोणाच्या उपयोगी आलो यात समाधान मानतो.
तर अशी होती माझी जीवन कथा.