English, asked by Kapue6143, 1 year ago

Marathi Letter Writing | Formal Letter Writing in Marathi Language

Answers

Answered by siddhi333
27

Explanation:

What is the subject?

You can get different types of topics and perfect format on YouTube just go and search...♥️♥️♥️♥️♥️

Answered by Hansika4871
99

Format:

नाव,

पत्ता___

दिनांक___

प्रति,

नाव,

पत्ता,

विषय:__________________

माननीय महोदय,

_____________________________

____________________________

आपला विश्वासू,

नाव.

Example१:

प्रति

अध्यक्ष

महाराष्ट्र शासन रोपवाटिका विभाग

विषय: रोपांची मागणी करण्याबाबत

महोदय,

मी खाली सही करणारा राहुल शाह, आनंदराव पवार शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे. आमच्या शाळेत एक मोठे मैदान आहे, त्या मैदानातील झाडे उन्हाळ्यामुळे सुकून पडली आहेत. तर मी आपणास विनंती करतो की आपण रंगीत, शोबिवंत रोपे पाठवावीत.

आपला विश्वासू,

राहुल शाह.

Example २:

प्रति

आयुक्त

महानगरपालिका

विषय: परिसरातील वाढतं ध्वनी प्रदुषण याबाबत.

महोदय,

मी खाली सही करणारा राज शेलार कांदिवलीतील रहिवासी असून गेले काही दिवस आमच्या परिसरात ध्वनी प्रदुषणचा वेळखा वाढत चालला आहे. उत्सवा निमित्त वाजवण्यात येणारे स्पीकर यांची आवाजाची पातळी वाढली आहे. परिसरातील लोकांना मानसिक त्रास होत आहे. कृपया आपण ह्याची दखल घेऊन कारवाई करावी.

आपला विश्वासू,

राज शेलार.

Example ३:

प्रति

आयुक्त

संभव स्पोर्ट्स अकादमी

विषय: क्रीडा साहित्य मागवण्याबाबत

महोदय,

मी खाली सही करणारा राज शेलार संपदा विद्यालयातील विद्यार्थी असून गेले काही दिवस आमच्या शाळेत क्रीडा साहित्यांची कमतरता जाणवत आहे. दिनांक २६ जुलै पासून शाळेत क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहेत . कृपया आपण ह्याची दखल घेऊन खालील प्रमाणे क्रीडा साहित्य पाठवावे.

बॅट: १० नग

बॉल: ५ नग

स्टॅम्प: ३ नग

हेल्मेट: ४ नग

आपला विश्वासू,

राज शेलार.

Example४:

प्रति

व्यवस्थापक,

सुरुची विज्ञान मंडळ

मुंबई ४००००९

विषय: आकाश दर्शन कार्यक्रम आयोजित करण्याबाबत.

महोदय,

मी खाली सही करणारा राजेश परब आनंदराव पवार विद्यालयातील विद्यार्थी असून आमच्या अभ्यास कार्यक्रमात आकाश निरीक्षण नावाचा विषय आहे. हा विषय खूपच मन भरवणारा आहे, पृथ्वीवरून दिसणारे अनेक तारे, ग्रह, चंद्र ह्या विषयी खोल अभ्यास शिकवला जातो. तरी प्रॅक्टिकल साठी आपण आकाश दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करावा ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,

राजेश परब.

Similar questions