India Languages, asked by Aquamarine18991, 11 months ago

Marathi nibandh-akasmak padlela paus

Answers

Answered by fistshelter
11

Answer: मी पाचवीत असतानाची गोष्ट आहे. उन्हाळ्याची सुटी लागली होती. मी आणि माझा लहान भाऊ मामाच्या गावी गेलो होतो.

मामाच्या गावी गेलो की आजी आजोबांसोबत शेतात जाणे हा आमचा अत्यंत आवडीचा उद्योग होता. एकदा असेच आम्ही शेतात गेलो होतो. सकाळी पावसाचा मागमूसही नव्हता. पण दुपारनंतर अचानक वातावरण बदलले. हळूहळू पाऊस पडू लागला. आम्ही आनंदाने भिजत होतो. परंतु पावसाचा जोर वाढू लागला. विजा चमकू लागल्या आणि ढग गडगडू लागले. मग आजोबा आम्हाला त्यांच्या मित्राच्या घरी घेऊन गेले. थोड्या वेळाने गारा बरसू लागल्या. आम्ही पहिल्यांदा गारा पाहत होतो. थोड्या वेळाने पाऊस थांबला. आकाशात सुंदर इंद्रधनुष्य उमटले. मी हे पहिल्यांदा पाहत होते.

असा हा अकस्मात आलेला पाऊस अविस्मरणीय होता.

Explanation:

Similar questions