India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Marathi Nibandh Jijamata
मराठी निबंध जिजामाता

Answers

Answered by Anonymous
14

❤❤HERE IS YOUR ANSWER ❤❤

 जन्म १२ जानेवारी १५९८    —  मृत्यू १७ जून १६७४

आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापशाली संभाजी महाराज ह्या मराठ्यांच्या दोन छत्रपतींना घडविणार्या विश्ववंद्य आदर्श राजमाता जिजाउंना त्रिवार वंदन !   जिजाउञ्चा जन्म १२ जानेवारी १५९८ बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजी जाधव यांच्या पत्नी म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई हिच्या पोटी झाला. म्हाळसाबाई हि निंबाळकर घराण्यातील होती.लखुजी जाधवाला दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि  बहाद्दुरजी, हे चार पुत्र आणि जिजाउ हि एक कन्या अशी पाच अपत्ये होती.शिक्षण-तत्कालीन सुखवस्तू मराठा मुलीनप्रमाणे जिजाऊंचे योग्य संगोपन करण्यात आले.तिला दांडपट्टा, अश्वारोहण वैगरे युद्ध कलांचे शिक्षण देण्यात आले.राज्यकारभाराचेही प्रशिक्षण मिळू लागले.

जिजाउं चा विवाह मालोजी राजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांचेशी दौलताबाद येथे डिसेंबर १६०५ साली मोठ्या थाटाने संपन्न झाला. या प्रसंगी मालोजीला निजामशहा कडून पाचहजारी मनसब, शिवनेरी, व चाकण हे किल्ले आणि पुणे व सुपे हे दोन परगणे जहागीर म्हणून मिळाले. जिजाउंना एकूण सहा अपत्ये झाली. त्यापैकि चार मृत्यू पावली. संभाजी व शिवाजी हे दोन होत. शहाजीं नी जिजाऊ ना शिवनेरीवर किल्ल्यात सुरक्षित ठेवले. येथेच १९ फेब्रुवारी १६३० साली जिजाउने शिवाजीस जन्म दिला. जिजाउचे पती शहाजीराजे फार पराक्रमी सेनानी होते.त्यांनी पुण्याच्या आसपासचा अहमदनगर व विजापूरचा प्रदेश काबीज करून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले परंतु विजापुरने ते लवकरच उध्वस्त केले . इ.स १६३९ ते १६४७ या काळात शहाजीने पुण्यात झांबरे  पाटलाकडून  जागा विकत घेवून ‘लाल महाल ‘ नावाचा राजवाडा बांधला . जीजावू व शिवाजी यांचा मुक्काम लाल महालातच होता. जिजाऊच्या आज्ञात शिवाजी आपल्या सवंगड्यासोबत युद्धकला शिकवू लागला. दऱ्याखोऱ्यात फिरू लागला. तान्हाजी मालुसरे, सूर्याजी काकडे , येसाजी कंक , बाजी जेथे वैगरे शेतकरयांची मुले शिवाजीचे जिवलग मित्र बनले. सर्वावर जीजावूंचा मायेची नजर होती . शिवाजीसह  सार्वजण जिजाऊच्या आज्ञेत वागत होते.

❤❤div❤❤

Answered by Haezel
46

मराठी निबंध जिजामाता :

राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड या गावी झाला. त्या प्रसिध्द अशा जाधव राजघराण्यातल्या होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव लखूजीराजे जाधव असे होते. जिजाऊंना  त्यांच्या वडिलांनी लहानपणा पासुन राजनीती, युध्दकलीचे शिक्षण दिले. त्या धैर्य, शौर्य, आत्मविश्र्वास आणि इच्छाशक्ती अशा गुणांनी परिपुर्ण होत्या. त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जिजामातांना एकुण २ मुले व ६  मुली होत्या. जिजाऊंनी त्याच्या मुलाला शिवाजी महाराजांना योध्यांच्या गोष्टी सांगणे , पराक्रमी भिम अर्जुनाच्या गोष्टी सांगुन त्यांच्या वर चांगले संस्कार कर्त होत्या. त्यांचे शिवबाच्या शस्त्रविद्ये कडे पण बारकाईने लक्ष ठेवत. त्यांनी शिवबांना राजनीती पण शिकवली. जिजामातांचे निधन १७  जुन १६७४ साली झाले. त्या एक उत्तम मुलगी, पत्नी, तसेच एक उत्तम आई होत्या.  


Anonymous: great answer ma'am :)
Similar questions