Speech on Vivekananda in Marathi
मराठी भाषण विवेकानंद
Answers
स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२) हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.
मराठी भाषण विवेकानंद :
स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ होते. यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकात्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्र्वनाथ दत्ता आणि आईचे नाव भुवनेश्र्वरी देवी होते. त्यांचे वडिल तेथील प्रसिध्द वकील होते. नरेंद्र वृतीने श्रध्दाळु व कनवाळु होते. ते बालपणी कोणतेही कृत्य धाडसीपणे करायचे. बालपणापसुन त्यांवर अध्यात्ममार्गाचे संस्कार झाले. त्यांना स्वभाषेवर खुप अभिमान होता म्हणून त्यांना शाळेत शिकवली जाणारी इंग्रजी भाषा नाईलाजास्तव शिकले. त्यांना समाजशास्त्र, इतिहास, कला व साहित्य या विषयांची आवड होती. त्यांनी गायन व वादनाचे शिक्षण घेतले. नरेंद्रांनी ब्राम्हण समाजात प्रवेश केला पण त्यांचे विचार नरेंद्रांना पटत नव्हते. १० मे १८९३ रोजी राजा अजितसिंग खेत्री यांनी नरेंद्रांना “विवेकानंद” या नावाने सन्मानित केले. विवेकानंद यांनी संपूर्ण जगात वेदांताचा प्रसार केला. ४ जुलै १९०२ या दिवशी वयाच्या ३९ व्या वर्षी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. त्यांनी स्वता:चे आयुष्य ४० वर्षे असेल अशी भविष्यवाणी केली ती खरी ठरली. कन्याकुमारी पासून काही अंतरावर समुद्रामध्ये विवेकानंदांचे स्मारक उभारले गेले.