India Languages, asked by ankit468, 1 year ago

marathi nibandh on vachnache mahatv

Answers

Answered by friendshipmasti
542
वाचनाचे महत्व आपण आपल्या शालेय जीवनापासून ऐकत आलोय. प्रत्येकजण आपल्याला वाचन किती महत्वाच आहे हे सांगत असतो. परंतु आपण खरचं वाचन करतो का? वाचायला आवडते का? वाचून काही फायदा होतो का? लोक वाचनाला एवढे महत्व का देतात?
१. वाचनामुळे मेंदुला चालना मिळते नवनवीन शब्दांमुळे त्याच्यात प्रगती होत असते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहीती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते.

२. सध्या आसपास अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. दुरदर्शन, संगणक व त्यावर खेळले जाणारे खेळ, मोबाईलवरील खेळ अशी साधने आपल्याला मानसिक आनंद देतात परंतु वाचनामुळे आपण लेखकाने लिहीलेल्या ठिकाणी जाऊन आल्याचा आनंद मिळतो. आपण त्यातील प्रत्येक पात्र जगत असतो.

३. वाचताना आपण लेखकाचं म्हणणे ऐकत असतो. सध्याच्या जीवनात ऐकण्यासाठी कोणाला वेळ नसतो. वाचनामुळे आपल्याला इतरांच ऐकायची सवय लागते. ऐकण्यासाठी संयम असायला हवा. वाचनामुळे आपण आपोआप संयम राखायला शिकतो.

४. अनेक नोकरीच्या संधी वाचनामुळे निर्माण होतात. अनेक ठिकाणी वाचनीय ज्ञान चांगले असते त्याला उत्तम प्रकारच्या नोकरीच्या संधी असतात. उत्तम वाचन असेल तर काम करताना ईमेल लवकर समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे कामाची गती वाढते.

५. सामान्य ज्ञान वाढते. आपल्याला जर वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यात मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो.

वाचनाचा आनंद लुटा. आपल्याला आवडणार्‍या विषयापासून सुरु करा. सवय आपोआप लागेल.

Answered by SharmilaPatil2122
29

Answer:

प्रस्तावना:

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वाचनाचे खूप महत्त्व आहे. आपण सर्वजण शाळेत असल्यापासून वाचनाचे महत्त्व ऐकत आलो आहोत. कारण शाळेत शिक्षक नेहमी वाचन किती महत्वाच हे सांगत असतात.

जे लोक अन्य पुस्तकांचे वाचन करतात त्यांना अनेक फायदे देखील होते. मनुष्याजवळ असलेले ज्ञान हे त्याची फार मोठी शक्ती आहे. कारण याच शक्तीच्या साहाय्याने मानव हुशार व चपळ बनतो.

मागच्या पिढीपेक्षा आजच्या पिढीचे वाचन हे अगदी सोपे झाले आहे. वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी तसेच प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये वाचनाची आवड निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे माणूस सुसंस्कृत बनतो.

वाचन म्हणजे काय –

वाचन म्हणजे आपल्या जीवनाला उन्नत करणारी गोष्ट ज्यामुळे आपली बुद्धी अधिक वाढते. तसेच माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा सर्वात मोठा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वाचनाचा छंद जोपासला पाहिजे आणि आपले जीवन समृद्ध केले पाहिजे.

त्याच बरोबर आपले जीवन परिपूर्ण बनवण्यासाठी वाचन गरजेचे आहे. आपल्या ज्ञानामध्ये अधिक वाढ करण्यासाठी वाचन हा एक सर्वात उत्तम मार्ग आहे.

वाचनालय

पूर्वीच्या काळी अन्य विषयांची पुस्तके मिळण्याची जागा म्हणजे – वाचनालय होय. आजच्या आधुनिक युगात सुद्धा वाचनालये विकसित आहेत. या वाचनालायत साहित्य, ग्रंथ, निबंध लेखन पुस्तक अशी अनेक प्रकारची पुस्तके असतात.

परंतु आज या पुस्तकांची जागा ही इंटरनेट ने घेतली आहे. आज ऑनलाईन साईट यामुळे अन्य विषयांवरील पुस्तके ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. असे असले तरी वाचन संस्कृती हळूहळू कमी होत चालली आहे.

वाचनाचे फायदे

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, वाचाल तर वाचाल हे अगदी खरे आहे. कारण मानव वाचन करून आपल्या जीवनाचा विकास करू शकतो.

Similar questions