India Languages, asked by inamdarmaruf13, 1 year ago

marathi patra lekhan format

Answers

Answered by girikadha
1

Answer:

marati patrakaar lekhan format se alag alag hai

Answered by halamadrid
3

◆◆मराठीत पत्र लेखनाचे उदाहरण◆◆

■■सहलीला जाण्यासाठी परवानगी मागण्यासाठी आईला लिहिलेले पत्र.■■

२,पवित्रसदन,

मंदिर मार्ग,

बोरिवली(पू)

मुंबई - ४०० ०६६

दि. ८ एप्रिल,२०२०

तीर्थरूप आईस,

शिरसाष्टांग नमस्कार.

कशी आहेस तू? मी इथे ठीक आहे. आशा करते, की तू सुद्धा ठीक असणार.मी हे पत्र तुला खास कारणासाठी लिहीत आहे.

या वर्षी आमची सहल महाबळेश्वरला जाणार आहे.माझ्या सर्व मैत्रिणी सहलीला जाणार आहेत.मला सुद्धा जायचे आहे.मला परवानगी देशील ना?

आमच्या शिक्षकांनी महाबळेश्वरचे छान वर्णन केले आहे.तिथे पाहण्यासरखे छान पॉइंट्स आहेत.मला प्रतापगड किल्ला सुद्धा पाहायचा आहे.महाबळेश्वरच्या निसर्गमय वातावरणाचा आस्वाद घ्यायचा आहे.

सहल फक्त तीन दिवसांची आहे.आमच्या सर्व शिक्षिका आमच्याबरोबर असणार आहेत.सहलीची वर्गणी फक्त दीड हजार रुपये आहे.लवकरात लवकर उत्तर व पैसे पाठव.

तीर्थरूप बाबांना नमस्कार,छोट्या पिंकीला अनेक आशीर्वाद.

तुझी लाडकी,

स्वाती.

Similar questions