Marathi poem on army
Answers
Explanation:
☞ बाबा बघा ना..दिवाळी आलीय ☜
देशासाठी सिमेवर लढताना
शहीद झाले तुम्ही,
तुमच्या या विरमरणाने
मात्र पोरके झालो आम्ही.
तुमच्या शिवाय ऐन सणासुदित
घरावर अवकळा पसरलीय.
बाबा...बघा ना दिवाळी आलीय. ॥ धृ ॥
सांगितले होते तुम्ही
या दिवाळीला सुट्टी घेइंन,
माझ्या साठी फटाके
अन् चिंगीला कपडे आणीन.
वाट बघतोय तुमची आम्ही
खोटिच आशा लागलीय.
बाबा..बघा ना दिवाळी आलीय. ॥ १ ॥
दररोज आजुबाजुचा परिसर
रोशनाइने उजळतोय,
आपल्या घरी मात्र फक्त
तुमच्या फोटो पुढील दीवा मिण मिंणतोय.
तुमच्या नसण्याने आमची
दिवाळी अंधारमय झालीय.
बाबा..बघा ना दिवाळी आलीय. ॥ २ ॥
सुवासिनी त्या नटून-थटून
नववस्त्रानी सजत आहेत,
आईचे मात्र आमच्या दरोज
साड्यांचे पदर भीजत आहेत.
बिना रंगोळीच्या आपल्या अंगणा सारखी,
तिच्या कपाळाची भग्न दशा झालीय.
बाबा..बघा ना दिवाळी आलीय. ॥ ३ ॥
ते आजी-आजोबा सतत
चष्म्या आडुन अश्रु गाळतात,
विचारल्यावर त्याना 'धुर झोम्बतोय फटाक्यांचा'
असा खोटा बहाणा करतात.
न झोप त्यांच्या नयनाना
हुन्दक्यानी मात्र छाती घेरलीय.
बाबा..बघा ना दिवाळी आलीय. ॥ ४ ॥
भाउबीजेला तुम्ही नऊवारी घेऊन,
आत्या कड़े जाणार होता,
मिठाई ची भेट देऊन मग
ओवाळून घेणार होता.
अशी कशी तिच्या आरतीवर
दैवान फुंकर मारलीय.
बाबा..बघा ना दिवाळी आलीय. ॥ ५ ॥
आता मी ठरवलंय...
तुमच्या सारखाच मीही सैनिक होईन...
देशासाठी सिमेवर लढाईस जाइन..
दुष्मनावर विजय मिळविंन..
तेव्हाच मिठाई वाटेन,
तेव्हाच फटाके फोडेन.
बाबा..बघा ना दिवाळी आलीय . ॥ ६ ॥
आणि माझ्या स्वागताला
घरात रोशनाई असेल.
दारात रंगोळी असेल..
आईच्या हाती आरती असेल..
तीच आम्हा सर्वांची दिवाळी असेल. ॥ ७ ॥
Answer:
आठवणींच्या जगात आज मी
सहजच हरवून गेलो आहे!!
पण भारतमाते तुला रक्षण्या
मी निडर होऊन इथे उभा आहे!!
आठवण त्या मातेची येते
जिच्या उदरात मी जन्म घेतला आहे!!
पण त्या मातेस तुला रक्षण्याचे
वचन मी देऊन आलो आहे!!
कुठे खांद्यावर हलकेच माझ्या
तो हात मखमली जाणवला आहे!!
पण भारतमाते मला उमगले
आईचे दुसरे रूप ही तू आहे!!
हो पाहते वाट माझी सखी
तिच्या नजरेत मी आज आहे!!
पण ती ओढ मग तुझ्या प्रेमाची
मला पुन्हा पुन्हा बोलते आहे!!
अनोळखी त्या शत्रू सोबत
मी अखेर पर्यंत लढणार आहे!!
पण मनात मला माझ्या मित्रांची
साथ नेहमीच भेटते आहे!!
एक सैनिक होऊन जगताना मी
तुला कित्येक वेळा वंदन करतो आहे!
हे भारतमाते तुला रक्षण्या
हे आयुष्य माझे मी दिले आहे!!
हे भारतमाते तुला रक्षण्या
हे आयुष्य माझे मी दिले आहे!!